झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' हे प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. या मालिकेने प्रेक्षकांचं चांगल मन जिंकली. गावच्या मातीतील गोष्ट कलाकारांनी अतिशय सुंदर पद्धतीने रुपेरी पडद्यावर मांडली. ही मालिका आणि कलाकार चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण आणि शिवानी बावकर यांचा फोटो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता निखिल चव्हाणने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर दोन फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये निखिल आणि अभिनेत्री शिवानीने फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवर We Looking At December अशी कॅप्शन दिली आहे. 


निखिल चव्हाणची पोस्ट 



या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवेने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर अनेकांनी पोस्टमध्ये 'लागिरं झालं जी लोकप्रिय जोडी' आणि अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स पाहायला मिळत आहे. 


निखिलच्या या पोस्टमध्ये चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालंय. नक्की ही पोस्ट काय सांगतेय? डिसेंबरमध्ये नक्की काय होणार? हे दोन कलाकार लग्न करणार का? या कलाकारांनी नवीन घर घेतलंय का? या ना अनेक प्रश्नांची चर्चा सुरु आहे. 


काय आहे सत्य?


याबाबत अभिनेता निखिल चव्हाणशी झी 24 तासने EXCLUSIVE बातचीत केली. यावर निखिलने या फोटोमागचं गुपित शेअर केलं आहे. निखिलने दिलेल्या माहितीनुसार, निखिलने पुण्यात नवं घर घेतलं आहे.  हे घर पाहण्यासाठी शिवानी निखिलच्या घरी गेली होती. एवढंच नव्हे तर निखिलचा आगामी प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात येणार आहे. तसेच शिवानीसाठी देखील डिसेंबर महिना महत्त्वाचा असल्याचं निखिलने सांगितलं. आता डिसेंबर महिना या दोघांसाठी खास आहे. डिसेंबर महिन्यात नक्की काय होणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


लागिरं झालं जी 


झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेत अभिनेता निखिल चव्हाणने विक्कीची भूमिका साकारली होती. तर शिवानी बावकरने शितलीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील निखिल आणि शिवानी या दोघांनी भावा-बहिणीचं नातं साकारलं होतं. या मालिकेने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. साताऱ्यातील गाव आणि तेथील परिसर प्रेक्षकांच्या पसंतीला पडलं. या फोटोनंतर पुन्हा एकदा मालिका चर्चेत आली आहे.