मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' एका वेगळ्याच वळणावर आहे. गायकवाड कुटुंबाची संकट आता दूर झाली आहेत. घरापासून दूर केलेली माणसं पुन्हा एकदा वाड्यावर आली आहेत. असं असताना आणखी एका कलाकाराची एन्ट्री या मालिकेत होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायकवाड वाड्यात लाडू आणि युवराज यांच्यासोबत खेळायला आणखी एका बालकलाकाराची एन्ट्री झाली आहे. ही गोंडस मुलगी नेमकी कोण आहे? तिचं नाव काय? हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. पण या नव्या बालकलाकाराचा EXCLUSIVE फोटो झी चोवीस तास डॉट कॉमवर


पाहा या गोंडस मुलीचा राणा दा आणि अंजली बाईंसोबत खास फोटो 



तुझ्यात जीव रंगला ही मालिका झी मराठीवरी लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांची आवडती आहेत. पण राणा दा, अंजली बाई आणि नंदिता वहिनी यांच्याबद्दल प्रेक्षक खास उत्सुक असतात. 


गायकवाड कुटुंबातील सर्व दुःख या दिवाळीच्या अगोदर दूर गेली आहेत. राणा आणि अंजली यांच्या सुखी संसाराला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. राणाने कुटुंबाची संपूर्ण संपत्ती लहान भाऊ म्हणजे सुरजच्या नावे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अंजलीने देखील दुजोरा दिला आहे. तसेच राणाने अंजलीला शिक्षण पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. आता या मालिकेत आता पुढे काय होणार? याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहिलं आहे.