मुंबई : सध्या घराघरात चर्चेत असलेली आणि आवर्जून पाहिली जाणारी मालिका तुझ्यात जीव रंगला एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला ही प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य करत आहे. या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई या 2 भूमिका प्रेक्षकांना आवडतात. पण आता या मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राणा हा तुरुंगातून पळ काढतो. पुरावे शोधण्यासाठी आणि पोलिसांपासून लपण्यासाठी तो हिंडत असतो. अंजलीला वाटतं की, राणाने शरण जावं. रितसर कोर्टकचेरीने प्रश्न मार्गी लागेल. या वरुन दोघांमध्ये वाद सुरु असतात. दुसरीकडे मामा, माधुरी आणि पप्या अंजली समोर असे चित्र उभे करतात की, अंजलीला देखील राणा हा चुकीचा वागतोय असं वाटू लागतं. 


पण राणा एका बेसावध क्षणी पकडला जातो. मोहिते आणि मामाची युती झाल्याने मोहिते राणाचा एन्काऊंटर करण्यासाठी त्याला मामाच्या ताब्यात देतो. राणाच्या एन्काऊंटरचा दिवस ठरवला जातो. दुसरीकडे अंजली राणाला शोधत असते. पण राणाचा शोध लागेपर्यंत मोहितेच्या बंदुकीतून गोळी सूटते. यानंतर आता पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सूकता आहे. 


राणा हा निर्दोष होता हे अंजलीला कळणार का? हे आगामी भागांमध्येच कळेल. 1 ऑगस्टला संध्या 7.30 वाजता मालिकेच्या या भागात तुम्हाला हे पाहायला मिळेल.