मुंबई : कॉमेडियन भारती सिंग नुकतीच आई झाली आहे. तिने पती हर्ष लिंबाचियासोबत मुलाचे स्वागत केले आहे. 1 एप्रिलला भारती सिंगला मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. ज्यानंतर भारतीने ही अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. परंतु भारतीने आज म्हणजे 4 एप्रिलला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारतीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आई बनल्याची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो भारतीच्या बाळाचा असल्याचं सांगितलं जात आहे. पण भारतीच्या हातात जे बाळ आहे, ते भारतीचं नाही. 



एवढंच नाही तर फोटोमध्ये जी महिला दिसत आहे, ती देखील भारती नसल्याचं समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो भारती आणि तिच्या बाळाचा नसून एडिट केलेला आहे. 


1 एप्रिलला भारती सिंगला मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. पण तेव्हा खुद्द तिने सर्व चर्चांना पूर्णविराव दिला.