मुंबई : सनी लिओनी  (Sunny Leone) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) मुलगा बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये शिकत आहे. तुम्हाला हे ऐकून जरा विचित्र वाटत असेल ना? होय पण हे खरं आहे. तथापि, प्रकरण थोडे वेगळे आहे. बिहारमध्ये बीए ऑनर्स द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याने गैरप्रकार करत फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिल्याने कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, बिहारच्या भीमराव आंबेडकर विद्यापीठांतर्गत असलेल्या धनराज महतो कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने फॉर्म भरताना त्याच्या पालकांची नावे अनुक्रमे सनी लिओनी आणि इमरान हाश्मी अशी भरली आहेत. कुंदन नावाच्या या विद्यार्थ्याने बीए द्वितीय वर्षाच्या फॉर्ममध्ये आपल्या पालकांच्या नावाच्या कॉलममध्ये अभिनेते-अभिनेत्रींची नावे भरली आहेत. एवढेच नाही तर विद्यार्थ्याने फॉर्ममध्ये भरलेल्या पत्त्यामध्ये स्थानिक रेड लाईट एरिया चतुर्भुज जागा भरलीये. पहा व्हायरल फॉर्म...



व्हायरल फॉर्म
यानंतर त्याचा फॉर्म इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल फॉर्म फार जुना आहे. पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर हा फॉर्म व्हायरल होत आहे. तर लोकं हा फॉर्म प्रचंड शेअर करत आहेत. जेव्हा हा फॉर्म व्हायरल झाला तेव्हा तो अभिनेता इमरान हाश्मीपर्यंत पोहोचला. या व्हायरल बातमीवर इमरान हाश्मीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. इम्रानने ट्विट केलं होतं की, 'मी शपथ घेतो की तो मी नाही.' इमरान हे ट्विट करताच हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं होतं.