मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची लव्हस्टोरी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही.  बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानची पत्नी गौरी खान हे एक प्रसिद्ध कपल आहे. गौरीला बी-टाऊनची 'पॉवर लेडी' देखील म्हटलं जातं. चित्रपटांपासून दूर राहणारी गौरी निर्माती आणि इंटेरिअर डिझायनरही आहे. तिने अनेक हाय-प्रोफाइल सेलिब्रिटींच्या घरांचे आणि ऑफिसचे इंटीरियर डिझाइन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नव्हेतर गौरी रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाच्या निर्मिती कंपनीची सह-संस्थापक आणि सह-अध्यक्ष देखील आहे. तिच्या क्षमतेच्या जोरावर गौरीने 2018 साली फॉर्च्यून इंडिया मॅगझिनच्या पहिल्या 50 शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. गौरी खान होण्यापूर्वी तिचं नाव गौरी छिब्बर असं होतं. गौरीचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत झाला. तिने राजधानीतील उच्च शाळा आणि महाविद्यालयांमधून शिक्षण घेतलं.


शाहरुख खान आणि गौरी खान जवळपास 8 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं. शाहरुख आणि गौरीचं नाव बॉलिवूडच्या परफेक्ट कपलमध्ये येतं. या जोडप्याला तीन मुलं आहेत. मोठा मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना खान आणि धाकटा मुलगा अबराम. अबराम खानचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. मात्र सध्या एक चर्चा जोरदार होत आहे. असं म्हटलं जातंय की, शाहरुख आणि गौरी यांच्यामध्ये एका अभिनेत्रीमुळे दुरावा आला आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो ही चर्चा जरी खरी असली तरी ती यावेळची नसून खूप जुनी आहे. मात्र पुन्हा एकदा या चर्चेनं जोर धरल्यामुळे शाहरुखचे चाहते चिंतेत आहेत. मात्र तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. 


शाहरुख आणि गौरीचे नातं सोपं नव्हतं. प्रियांका चोप्राच्या शाहरुखसोबतच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्याने दोघांचं नातं अडचणीत आलं होतं. एक काळ असा होता की, शाहरुख प्रियांकावर मोहित झाला होता. असं म्हटलं जातं की,  प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान जवळ आल्याने त्यांची पत्नी गौरी खान खूप चिडली होती आणि त्यांचं लग्न तुटण्याच्या मार्गावर होतं. मात्र, कालांतराने गौरीनेच हे नातं सांभाळलं आणि शाहरुखला प्रियंकासोबत काम न करण्यास सांगितलं.


शाहरुख आणि गौरीचे लग्न 1991 मध्ये झालं होतं. पण गौरीच्या कुटुंबाला दाखवण्यासाठी शाहरुख खान 5 वर्षे हिंदू म्हणून जगत होता, मात्र सत्य बाहेर आल्यावर एकच गोंधळ उडाला. यानंतर दोघांना तीन वेळा लग्न करावं लागलं. पहिला विवाह कोर्ट मॅरेज, दुसरा मुस्लिम रितीरिवाजांनुसार आणि तिसरा लग्न पंजाबी पद्धतीने. मात्र, लग्नानंतर हळूहळू सगळं सुरळीत झालं.


गौरी खान ही करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार गौरी 1725 कोटींची मालकीण आहे. त्याचबरोबर तिचा पती शाहरुख खान ५९८३ कोटींचा मालक आहे. दोघांची एकूण संपत्ती 7304 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.


26 ऑगस्ट 1991 रोजी शाहरुख गौरीने कोर्ट मॅरेज केल्यानंतर लग्न केलं. यामध्ये गौरीचं नाव 'आयशा' ठेवण्यात आलं होतं. यानंतर, 25 ऑक्टोबर 1991 रोजी दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं, ज्यामध्ये शाहरुखचं नाव 'राजेंद्र कुमार तुली' ठेवण्यात आलं होतं.