Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. काल 25 फेब्रुवारी रोजी उर्वशीनं तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. तिला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रॅपर हनी सिंगनं एक आगळावेगळा केक भेट केला आहे. उर्वशीनं त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. हे सांगत उर्वशीनं खुलासा केला की हा केक '24 कैरेट सोने का केक' होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीनं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केली होती. ही पोस्ट शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की हा केक '24 कॅरेट सोन्याचा आहे.' तर तिच्या या 3 टियर गोल्ड केकची किंमत 3 कोटी रुपये आहे. बर्थ डे सेलिब्रेशनविषयी बोलायचे झाले तर तिनं लाल रंगाचा स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला आहे. हा हाय स्लिट ड्रेस सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. उर्वशीनं तिच्या ड्रेसचा लूक चांगला दिसवा म्हणून कानातले आणि गळ्यात नेकपीस घातला आहे. हनी सिंहनं काळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. त्या दोघांपेक्षा केकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 



दरम्यान, टेबलवर असलेला हा केक सगळ्यांचे लक्ष त्याच्या किंमतीमुळे चर्चेत आहे. केकचा एकदम असा शाही लूक आहे. त्यावर फूलांची आयसिंग करण्यात आली असून सोन्याचा मुलामा लावला आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का केकला मुलामा केला तरी त्याची किंमत ही 3 कोटी नसू शकते. त्याचं कारण म्हणजे 1 किलो 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 62 लाख आहे. जर केक या केकसाठी 3 किलो सोनं वापरलं तर त्यासाठी देखील 1.86 कोटी लागले असते. जर हा केक अखंड सोन्याचा असता तरी 1.86 कोटी रुपयांचा. तो एडिबल आहे. जर यात इतका केक असता तर हा केक खाता आला नसता. अमेरिकेत सुद्धा 24 कॅरेट गोल्ड केकची किंमत ही 1200 डॉलर्स आहे. भारतात ते जवळपास एक लाख होतात.


हेही वाचा : 'रेस्तराँमध्ये बदलले कपडे, बेंचवर झोपून...'; विवेक ओबेरॉयची का झालेली इतकी दयनीय अवस्था


उर्वशीनं 2015 मध्ये मिस डिवा यूनिवर्सचा खिताब जिंकला होता. तिनं 'सिंह साब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय ती 'सनम रे', 'ग्रेट ग्रैंड मस्ती', 'हेट स्टोरी 4' आणि 'पागलपंती' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.