Fact Check : पती अभिषेकने उघड केलं ऐश्वर्याचं मोठं सत्य; हे सेलिब्रिटी कपल घेणार घटस्फोट?
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे कपल बॉलिवूड चं प्रसिद्ध कपल आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्या दोघांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यात ऐश्वर्या ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे कपल बॉलिवूड चं प्रसिद्ध कपल आहे. नेहमी हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. बी-टाऊनचं सर्वात आवडतं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... दोघांनी त्यांचं पती-पत्नीचं नातं अतिशय सुंदरपणे जपलं आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक जोडप्यांचं लग्नानंतर काही वर्षात घटस्फोट झालं... पण ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं लग्नाच्या 15 वर्षांनंतरही टिकून आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं. सोशल मीडियावर देखील दोघांबद्दल कोणती गोष्ट समोर येईल या प्रतीक्षेत चाहते असतात. आता सुद्धा ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बंटी और बबली या सिनेमा दरम्यान या दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर खुलू लागले.
यानंतर या दोघांनी धूम या सिनेमात एकत्र काम केलं. या दोघांनी ऐकमेकांना डेट केल्या नंतर 'गुरू' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ऐश्वर्याने अभिषेकला लग्नाकरता प्रपोज केलं. या दोघांच्या १५ वर्ष पुर्ण झाली असून हे कपल सुखी आयुष्य जगत आहेत. मात्र सध्या हे कपल घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र हे सत्य नसून ही एक अफवा आहे.
नुकतीच अभिषेकने एक मुलाखत दिली ज्यात अभिषेक म्हणाला, ऐश्वर्या आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम करतो. ऐश खूप सपोर्टिव्ह आहे. ती नेहमीच माझ्या वाईट काळातही माझ्यापाठिशी खंबीरपणे उभी असते.'' त्यामुळे त्यांची ही केमिस्ट्री पाहता त्यांच्यात सगळं काही छान सुरुये. मात्र समोर आलेली ही बातमी पुर्णपणे खोटी असून त्यात काहीच तत्थ नाहीये. यादोघांना 11 वर्षांची मुलगी आहे. जिचं नाव आराध्या असं आहे.