सोनू सूदच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एंट्री; मुलाच्या वयाच्या मुलीला करतोय डेट?
दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा सोनू सूद मात्र सध्या काही फोटोंमुळे चर्चेत आला आहे.
मुंबई : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता सोनू सुद हा बॉलीवूडचा एक आघाडीचा नायक आहे. खलनायकापासून नायकापर्यंत, ऐतिहासिक भुमिकांपासून ते स्टंटबाज कलाकारापर्यंत त्याची ख्याती बॉलीवूडमध्ये पसरली आहे. सोनु सुदला बॉलीवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती 'दबंग' या चित्रपटामुळे. त्यात त्याने साकारलेला विलिन चेढ्ढी सिंग हा प्रचंड गाजला.दोन वर्षांपुर्वी करोनाच्या पार्श्वभुमीवर सोनु सूद हा अभिनेता गरजूंच्या मदतीसाठी धावून आला होता. त्याने केलल्या मदतीचं सर्व स्तरावरुन कौतुकही झालं होतं.
दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा सोनू सूद मात्र सध्या काही फोटोंमुळे चर्चेत आला आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत सोनू सूद एका मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) सोबत दिसत आहे. या मुलीचं नाव सुश्मिता पुजारी (Sushmitha Poojary )असं आहे. मुख्य म्हणजे, सुश्मिताच्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर सोनूसोबतचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एवढंच नव्हेतर सोनू सूद इंस्टाग्रामवर सुश्मिताला फॉलोही करतो. तर सुश्मिताही सोनूला इंस्टाग्रामवर फॉलो करतो. सुश्मिता एक हवाई सुंदरी आहे. एवढंच नव्हेतर सोनू सुश्मिताच्या फोटोवर लाईक्स कमेंट्सही करतो. यानंतर सगळीकडे या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
जरी या सगळ्या चर्चांमध्ये तत्थ असलं तरीही या दोघांकडूनही या चर्चांना दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कोणतं नात आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कदाचित या दोघांमध्ये केवळ मैत्रीचं नातंही असू शकतं.
आम्ही तुम्हाला सांगतो की, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गरिबांचा देव म्हटलं जाणारा अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. खऱ्या आयुष्यात तो विवाहीत आहे. आणि तो त्याचं विवाहीत जीवन आनंदाने जगत आहे. सोनू सूदच्या पत्नीचे नाव सोनाली आहे. सोनालीच्या सौंदर्यामुळे सोनू सूद चांगलाच लाइमलाइट आला होता. सोनू सूदही अनेक प्रसंगी आपल्या पत्नीचं कौतुक करतो.
सोनू सूदची पत्नी भलेही बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय नसेल पण ती इतकी सुंदर आहे की कोणीही तिचं सौंदर्य पाहून घायाळ होईल. सोनू सूदची लिंकअपची होणारी चर्चा केवळ अफवा आहे. कारण सोनू त्याचं वैवाहिक जीवन खूप आनंदाने जगत आहे.