Ranbir Kapoor नं का फेकून दिला होता चाहत्याचा फोन? अखेर कारण आलं समोर
Ranbir Kapoor चा काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते आणि आता त्याचे सत्य समोर आले आहे.
Ranbir Kapoor Viral Video : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीर त्याच्या चाहत्यांसोबत चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याचे दिसते. त्यानंतर अनेकांना रणबीरला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. मात्र, रणबीरनं नक्की असं का केलं त्याचं आता सत्य समोर आलं आहे.
रणबीरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत रणबीर आलाय हे कळल्यामुळे गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर रणबीरचा एक चाहता येतो आणि तो त्याच्यासोबत सतत फोटो काढताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक चाहता रणबीरसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही त्याला फोटो क्लिक करता आला नाही. त्यानंतर रणबीरला राग येतो आणि तो चाहत्याचा फोन फेकून देतो. त्यानंतर त्याचा फॅन त्याला पाहत राहिलेला दिसतोय. सध्या हा व्हिडिओ व्हायरल (Ranbir Kapoor Viral Video) होताना दिसतोय. हे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.
रणबीर कपूरचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (Ranbir Kapoor Upcoming Movies) अनेकांनी रणबीरच्या येत्या मुव्हीचं प्रमोशन असल्याचं म्हटलंय तर, अनेकांनी हा कोणता माज?, असा सवाल केला आहे. त्यामुळे आता बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आता अँग्री मॅन झालाय, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, या व्हिडीओ मागचं सत्य आता समोर आलं आहे. आता या व्हिडीओचा पुढचा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीर त्या चाहत्याचा जुना फोन फेकून त्याला नवीन OPPOReno8T हा नवीन फोन भेट म्हणून देतो. हा एक प्रमोशन्ल व्हिडीओ असल्याचे आता समोर आले आहे.
हेही वाचा : 'मला तुझी दुसरी पत्नी बनव...', Urfi Javed ची शाहरुख खानकडे मागणी
दरम्यान, रणबीरचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि रणबीरमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. शाहरुख आणि रणबीरचा हा व्हिडीओ फिल्मफेअर अवॉर्डचा आहे. या व्हिडीओत शाहरुख बोलतो की, 'रणबीर, गेल्या दोन वर्षात इमरानसोबत केलेलं तुझं सुत्रसंचालन पाहिलं आणि तू चांगंल काम केलंस. यावर रणबीर शाहरुखचे आभार मानतो, ज्यावर शाहरुख पुढे बोलतो, मला वाटलं की स्टेजवर तू थोडी ओव्हर अॅक्टिंग करतोस, तर यंदाच्या वर्षी एक विनंती आहे की कृपया ओव्हर अॅक्टिंग करू नकोस.'
रणबीर शाहरुखला उत्तर देत बोलतो, जर मी ओव्हरअॅक्टिंग केली तर त्याला फिल्मफेअरला त्याचे नाव बदलून डॉन 2 असे नाव द्यावे लागेल. यावर शाहरुख त्याच्या शैलीत उत्तर देत बोलतो, "संभाल के हीरो... संभाल के, जितनी तेरी गर्लफ्रेंड नहीं हुई ना बचपन से..., उससे ज्यादा फिल्मफेअर अवॉर्ड्स मेरे पास है" शाहरुखचं हे उत्तर ऐकूण तेथे उपस्थित असलेले लोक हैराण होतात.