मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन टीकू तलसानिया यांचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या व्हिडिओवरुन असा दावा केला जात आहे की टीकू तलसानिया यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. व्हायरल फोटोमध्ये टीकू यांच्या डोक्यावर एक टोपी आहे आणि दाढी वाढलेली दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये एक मुलगी त्यांना म्हणते, "चचा, सलाम वालेकुम". त्या मुलीला उत्तर देत टीकू म्हणतात, "वालेकुम अस्सलाम". त्यानंतर एक मुलगी त्यांना विचारते तुम्ही कसे आहात, यावर टीकू म्हणतात. "खैरियत."


या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर एकच चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. यावर अधिक रिसर्च केली असता हा व्हिडिओ कधीचा आहे. आणि यामागील सत्य काय आहे हे समोर आलं आहे.


सुरुवातीला टीकू यांच्या व्हिडिओचे स्क्रीन शॉर्ट काढून काही यूजर्सने अशी बातमी पसरवली की अभिनेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. याबाबत अधिक माहिती काढली असता.



हा फोटो टीकू यांच्या सेटवरील एक व्हिडिओतून घेण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर टीकू यांचा संपुर्ण व्हिडिओ देखील व्हायरल झाला.



यावेळी व्हिडिओच्या शेवटी सेटवरील टीम यात दिसताच हा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचं समोर आलं.  त्यांना हा मुस्लिम लूक आपल्या भूमिकेसाठी केला होता.