Falguni Pathak Navratri Song Release: गणेशोत्सव संपल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे...नवरात्री सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. नवरात्र आणि गरबा नृत्य असं एक समीकरण आहे. त्यामुळे नऊ दिवस रात्री गरब्याचं आयोजन केलं जातं. गाण्यावर आनंदाने ठेका धरला जातो. मात्र गेल्या काही वर्षात फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) आणि गरब्याचं गाणं असं एक नातं तयार झालं आहे. गरबाप्रेमी दरवर्षी फाल्गुनी पाठकच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहात असतात. नुकतंच 'वसालडी' (Vasaladi) गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यावर ठेका धरण्यासाठी गरबाप्रेमी सज्ज झाले आहेत. तुम्हीही हे गाणं ऐकलं नसेल तर त्याची झलक ऐका..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाल्गुनीने या गाण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. विनोद भानुशाली निर्मित, हे गाणे शैल हांडा सोबत आहे. या गाण्याचे संगीतकार शैल असून त्याचे बोल भोजक अशोक अंजाम यांनी लिहिले आहेत. या गरब्याचा व्हिडिओ जिगर सोनी आणि सुह्रद सोनी यांनी कोरिओग्राफ केला आहे. तर या अल्बमचे दिग्दर्शन संजय लोंढे यांनी केले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नवरात्रीत 'वासलाडी' हे गाणं चाहत्यांसाठी एक भेट आहे. फाल्गुनीला आशा आहे की, या गरब्यात चाहते तिचे गाणे लूपमध्ये वाजवतील आणि त्यावर थिरकतील.