Falguni Pathak : फक्त नवरात्रीला चर्चेत येणारी फाल्गुणी पाठक किती कमवते? नेटवर्थ ऐकून झोप उडेल!
Falguni Pathak Fee For Navratri Event: 55 वर्षांच्या फाल्गुनी पाठक या दांडीया क्विन नावाने ओळखल्या जातात.
Falguni Pathak Fee For Navratri Event: गणेशोत्सव संपल्यानंतर भक्तांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवस दांडीया खेळण्याची एक वेगळीच मजा असते. दांडीया जर फाल्गुनी पाठक यांचा असेल तर मजा काही औरच..दांडीया आणि फाल्गुनी पाठक हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे समीकरण बनले आहे. वर्षेभर कुठेच फारशा चर्चेत नसलेल्या फाल्गुनी पाठक यांच्याशिवाय दांडीयाच्या चर्चा पूर्ण होत नाही. फाल्गुनी यांच्याशिवाय गरबा अपूर्ण आहे. फाल्गुनी अनेक ठिकाणी जाऊन इव्हेंट करतात. नवरात्रीच्या या 9 दिवसात फाल्गुनी पाठक किती रुपये कमावतात? तुम्हाला माहिती आहे का?
55 वर्षांच्या फाल्गुनी पाठक या दांडीया क्विन नावाने ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या सिंगिंग करिअरची सुरुवात 1988 मध्ये केली. 'मैने पायल है छनकाई' आणि 'मेरी चूनर उड उड जाए' सारखे हिट्स नंबर त्यांनी दिले आहेत.
नवरात्रीमध्ये एका इव्हेंटची किती फीस?
फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या 9 दिवसात तगडी कमाई करतात. यादरम्यान देशातील वेगवेगळ्या भागात होणाऱ्या इव्हेंटसाठी त्यांना होस्ट म्हणून बोलावले जाते. या एका इव्हेंटसाठी फाल्गुनी तगडी फीस घेतात. फ्री प्रेस जर्नलच्या एका रिपोर्टनुसार फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या एका इव्हेंटसाठी साधारण 20 ते 25 लाख रुपये चार्ज करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये त्या साधारण 1.4 कोटी रुपयांची कमाई करतात.
बॉलिवूडला नाही घेतलं गांभीर्याने
हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत फाल्गुनी यांनी आपल्या बॉलिवूड करिअरवर भाष्य केले. मला ऑफर आल्या. पण मी बॉलिवूडला कधीच फारसं गांभीर्याने घेतलं नाही. सिने जगतात टिकून राहण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. मी माझे शो आणि अल्बम करुन खूष असल्याचे फाल्गुनी पाठक यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.
मीडिया रिपोर्टनुसार फाल्गुनी पाठक यांचे एकूण नेटवर्थ 130 कोटी रुपये इतके आहे. मुंबईत राहणाऱ्या फाल्गुनी यांच्याकडे जर्मन ल्गझरी कार मर्सिडीजदेखील आहे.