मुंबई : कॉमेडिअन सिद्धार्थ सागर बेपत्ता असल्याच्या माहितीने सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन आपण एक भयंकर प्रसंगातून गेल्याची माहिती त्याने दिली.  त्याचबरोबर लवकरच माझ्या फॅन्सना यामागची कारण सांगेन असेही तो म्हणाला होता. त्यानुसार धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिद्धार्थचे आईवडिल २० वर्षांपूर्वी वेगळे झाले. माझ्या आईच्या आयुष्यात सुयश गाडगीळचा प्रवेश झाल्यानंतर माझ आयुष्य बदलल्याचे सिद्धार्थ सागरने सांगितले. म केवळ शारिरीक आण मानसिक रुपता छळ केला जायचा. एवढच नव्हे तर मला जेवणातून ड्र्ग्जही दिले जायचे असा आरोप त्याने केला आहे. 


आजार नसताना मला गोळ्या दिल्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला बाइपोलर डिसऑर्डर असल्याचे माझ्या घरातल्यांनी सांगितले आणि त्याच्या गोळ्या मला दिल्या जात आहेत. माझ्या शरिरात या आजाराची कोणतीच लक्षण नाहीएत. माझ्या घरची आर्थिक परिस्थितीही ठिक नसल्याचे मला याकाळात समजले. सिद्धार्थ बेपत्ता असल्याची पोस्ट त्याची आई सोमी सक्सेनाने आपल्या फेसबुकपेजवर दिली होती. 


त्याने सांगितले की...


सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितले की, मी गेल्या वर्षभरापासून प्रचंड त्रासातून जात आहे. मला माहित आहे की, माझ्या अचानक गायब होण्याने खूप त्रास झाला असेल. लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची सविस्तर माहिती देईन. आता फक्त इतकंच सांगतो की, मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्या कुटुंबात गेल्या काही काळापासून प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहेत. मी आता सुरक्षित आहे आणि या सगळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.


त्याचबरोबर पुढे तो म्हणाला की, मी लोकांना मदतीचे आवाहन केले होते. पण कोणीच मला मदत केली नाही. तसंच त्याने एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला. त्याने सांगितले की, एक अनोळखी मुलगी मला टॅबलेट्स देत होती. त्यामुळे मी नशेत राहायचो. मी माझ्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती.