मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी या मालिकेतील अभिनेता डॉ ज्ञानेश माने यांचं दुर्देवी निधन झालं आहे.  डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करत होते. या प्रवासा दरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.  अपघातानंतर लगेच त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ जानेवारी रोजी सकाळीच त्यांनी दवाखान्यातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बारामतीतील उत्कृष्ट कलाकार गमावल्याची हळहळ व्यक्त होत आहे. अभिनेते डॉ ज्ञानेश माने लागिरं झालं जी या मिलिकेत एका महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. डॉ ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मुळचे ते बारामतीतील झारगवाडी या गावचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.



लागिर झालं जी या मालिकेशिवाय ते काळूबाईच्या नावानं चांगभलं, आंबूज, हंबरडा, यद्या, पळशीची पी टी, अशा अनेक मराठी सिनेमातही झळकले होते.  अभिनयासोबतच ते पेशाने डॉक्टर होते. त्यामुळे त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केलीये.