Actor Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. त्यांना पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Vikram Gokhle Admited To Dinanath Hospital Pune) गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्ण्यालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असण्याविषयी त्यांच्या कुटूंबियांनी आणि डॉक्टरांनी माहिती दिली आहे. (Vikram Gokhale Health News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांच्या अभिनयानं वर्चस्व केलं आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. तर 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. (famous actor Vikram gokhales health updates critical treatment undergoing at hospital pune news marathi) 


हेही वाचा : 'तू मुस्लिम...', Govinda च्या पाया पडल्यामुळे 'हा' Pakistani Actor ट्रोलर्सच्या निशाण्यावर



विक्रम गोखली यांनी घश्याच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला होता. 


विक्रम गोखली यांनी घश्यातील त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला. तर विक्रम गोखले हे गेल्या आता नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत. दरम्यान, फक्त विक्रम गोखले नाही तर त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी देखील 70 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.