Archana Gautam : रिअलिटी शो स्टार अर्चना गौतम ही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अर्चना गौतमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉंग्रेसची माजी लोकसभा उमेदवार आणि अभिनेत्री अर्चना गौतम ही 29 सप्टेंबरला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पोहोचली होती. अर्चनासोबत तिचे वडील सुद्धा यावेळी पोहोचले होते. यावेळी या दोघांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यांच्यासोबत काही महिलांनी गैरवर्तन केलं. तिचे केस ओढून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. 


अर्चनानं घडलेल्या प्रकाराबाबत बोलण्यास दिला नकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्चना गौतमनं तिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्चना केवळ महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खरगे आणि प्रियांका गांधी यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या. मात्र, अर्चना आणि त्यांच्या वडिलांना कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. यासंदर्भात अर्चनानं कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अर्चना काही बोलली नाही, पण तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अर्चनाच्या मागे अनेक लोक धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी हे लोक काय बोलत आहेत हे मात्र, कळलेलं नाही. ज्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला त्यात असं सांगण्यात आलं आहे की काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला बाहेर तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अर्चनाच्या वडिलांनी केली होती तक्रार


मिळालेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या वडिलांनी प्रियांका गांधी यांचा पीए संदीप सिंहच्याविरोधात मार्चमध्ये मेरठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत संदीप सिंहनं मुलगी अर्चनाला जीवे मारण्याची धमकी दिली, असं लिहिलं होतं. याप्रकरणी मेरठ पोलिसांनी कलम 504, 506 आणि एससी एसटी कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली होती. याचा मनात राग धरून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अर्चना आणि तिच्या वडिलांना धक्काबुक्की करत त्यांना कार्यालयातून बाहेर काढलं.


हेही वाचा : 'यापेक्षा मरण बेहत्तर...', शहनाज गिलनं इंडस्ट्रीविषयी केला धक्कादायक खुलासा


अर्चनाविषयी बोलायचे झाले तर अर्चना गौतम ही यूपी विधानसाभ निवडणूकीत मेरठच्या हस्तिनापुर विधानसभेत कॉंग्रेस पार्टीची उमेदवार होती. अर्चनानं 2022 मध्ये यूपी विधानसभा निवडणूक हस्तिनापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश खाटिक यांच्या विरोधात लढवली होती, ज्यामध्ये तिचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.