Famous Actress Became mother at the age of 41 : बॉलिवूड अभिनेत्री आरती छाबडिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरून आरतीनं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यावेळी तिनं सांगितलं होतं की ती आई होणार आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहितीये का की आरती महिन्याभरापूर्वीच आई झाली आहे. तिनं गेल्या महिन्यातच मुलाला जन्म दिला आहे. पण इतके दिवस आरतीनं तिच्या प्रेग्नेन्सीविषयी सगळ्यांपासून का काही लपवून ठेवलं. याविषयी तिनं स्वत: सांगितलं आहे. 


40 शीत आई होणं कठीण!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत आरतीनं तिच्या आई होण्याच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. आरती म्हणाली की, "जितकं 20 शीत किंवा 30 शीत असतं, तितकं जेव्हा तुम्ही 41 वर्षांचे होतात तेव्हा सोप नसतं. भूतकाळात मी एका फेल्ड प्रेग्नंसीचा सामना केला आहे. त्यामुळे मी विचार केला की मी हे तेव्हाच सांगेन जेव्हा योग्य वेळ येईल. त्यामुळे वेळेच्या आधी यावर मला काही बोलायचं नव्हतं. याविषयी स्पष्ट बोलायचे झाले तर मी पण एक माणूस आहे. या दरम्यान, मी अनेक गोष्टींचा सामान केला आहे. लोकांचं असं म्हणणं असतं की ही तर एक कलाकार आहे. त्यामुळे तिच्यासाठी तर हे सगळं सोप असेल, पैसे देऊन होईल. असं नाही आहे. ही ट्रीटमेंट तुमच्या बॉडीवर खूप परिणाम करते. माझी डबल चीन होत आहे. माझं शरीर हे जसा शेप असलायचा हवा त्याच्या विरुद्ध दिसतंय. हे सगळं वेगवेगळ्या गोळ्यांमुळे होत आहे आणि या गोष्टीचा मी सामना करु शकत नाही. मी एक सायकल पेक्षा जास्त करण्यासाठी तयार नव्हती. मी दमले होते." 



गर्भपातानंतर बसला धक्का


लग्नानंतरच्या काळाविषयी बोलत असताना आरती म्हणाली, "कोव्हिडच्या काळात आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये अडकले होतो. हे खूप तणावाचं होतं. या सगळ्या स्ट्रेटमध्ये कन्सिव्ह करणं कोणासाठीही कठीण असतं. याच दरम्यान, मी कन्सिव्ह केलं, पण स्ट्रेसमुळे माझा गर्भपात झाला. माझ्यासाठी तो काळ खूप वाईट होता. पण, आता मुलाच्या जन्मानंतर असं वाटतंय जणू माझ्या सगळ्या अडचणी या दूर झाल्या आहेत. तो आमच्या सगळ्यांसाठी कठीण काळ होता. पण ते सगळं सहण करणं आता यशस्वी पद्धतीनं झालं आहे." 


हेही वाचा : 5 वर्षांपासून नोरा फतेही सहन करतेय त्रास, फिजियोथेरेपीशिवाय सेटवर उभी राहू शकत नाही...


दरम्यान, आरतीनं 2019 मध्ये विशारद बीडासीशी लग्न केलं. त्यानंतर ती नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली. आरतीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'आवार पागल दीवाना', 'तुमसे अच्छा कौन है',  'मिलेंगे मिलेंगे' आणि 'हे बेबी' या चित्रपटांमध्ये दिसली. त्याशिवाय ती 'खतरों के खिलाडी सीजन 4' और 'झलक दिखला जा 10' मध्ये देखील दिसली होती.