Kapil Sharma Insatgram Video: कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या नव्या शोसह लवकरच टिव्हीवरती पुनरागमन करत आहे. काही जुने तर काही नवीन कलाकार या शोमध्ये सहभागी होणार आहेत. द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) नं अल्पावधीच लोकप्रियता मिळवली होती. आता हा शो भारतातच नाही तर जगभरात पाहिला जातो. या रिएलिटी शोचा (Reality Show) जगभरात प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. (famous comedian kapil sharma sungs a song at a stage performance in australia fans praises him video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आपल्या नव्या शोच्या तयारीसाठी लवकरच कपिल शर्मा टिव्हीवर आपल्या नव्या फौजेसह येणार आहे. त्यासाठी सध्या कपिल शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये शूट करत असल्याचे बोलले जात आहेत. 


नुकताच इन्टाग्रामवर कपिलनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात कपिल शर्मानं आपल्या नव्या टेलेंटचे प्रदर्शन केले आहे. आपल्या नव्या अंदाजासह कपिल शर्मानं स्टेजवर गाण्याचा अफलातून परफॉर्मन्स दिला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनीही त्याच्यावर आनंदाचा शिडकावा केला आहे. 


कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्यासह इतर सदस्यांसह ऑस्ट्रेलियात आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. 


कपिल शर्माने ऑस्ट्रेलियात एक गाणे गायले आहे. कपिल शर्माने काही काळापूर्वी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये तो स्टेजवर चढून कॉमेडी करण्याऐवजी गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून चाहत्यांसह स्टार्सही कपिलचे कौतुक करताना दिसत आहेत.कपिल शर्माच्या व्हिडिओला अल्पावधीतच 2 लाख 9 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कपिल शर्मा लवकरच 'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) त्याच्या नवीन सीझनसह टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. हा शो सोनी टीव्हीवर 10 सप्टेंबरपासून शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे. यावेळी या शोमधून सुमोना चक्रवर्ती, चंदर प्रभाकर, किकू शारदा आणि अर्चना पूरण सिंग यांच्यासह काही नवीन चेहरेही दिसणार आहेत. या नव्या चेहऱ्यांमध्ये सिद्धार्थ सागर, मस्की श्रीकांत, गौरव दुबे, सृष्टी रोडे आणि इश्तियाक यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.