मुंबई : लोकप्रिय कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या दोघांना एकत्र बघण्यासाठी प्रेक्षक पुन्हा आतुर झाले आहेत. पण दोघांमध्ये फारच मोठी दरी निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे ते कधी एकत्र येणार हे आत्ताच सांगता येणं कठिण आहे. 


‘काय सुरू आहे’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर सुनील ग्रोव्हर ब-याच महिन्यांपासून गायब आहे. पण गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदेसोबतच सुनीलचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत दोघेही लॅपटॉपवर काहीतरी बघत असल्याचे दिसत आहे. या फोटोला ‘काय सुरू आहे’ असं कॅप्शनही देण्यात आलंय. 



शिल्पा-सुनील एकत्र शो करणार?


महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, अभिनेत्री शिल्पा शिंदे कलर्स चॅनलसाठी एक शो करू शकते. बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये विजेत्या ठरणा-या व्यक्तीला चॅनेलसोबत कॉन्ट्रॅक्ट करायचा असतो. त्यामुळे अंदाज लावले जात आहेत की, शिल्पा कलर्स चॅनेलसोबत एक नवीन शो करू शकते. अशात तिच्यासोबत सुनील ग्रोव्हर दिसत असल्याने असेही मानले जात आहे की, हे दोघे मिळून एखादा कॉमेडी शो घेऊन येऊ शकतात. 


सुनील सध्या टीव्हीपासून दूर जगभरात स्टेज शो करण्यात बिझी आहे. अशात जर या दोघांनी एखादा एकत्र शो केला तर प्रेक्षकांसाठी ही धमाकेदार ट्रीट ठरू शकते.