मोठा धक्का... प्रसिद्ध कलाकाराचा जगाला अखेरचा निरोप
आता त्यांच्यासारखी जादू कोण दाखवणार...
मुंबई : प्रसिद्ध जादूगार ओपी शर्मा (famous magician op sharma) यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये जगाचा निरोप घेतला. आपल्या जादूने जगाला थक्क करणारा हा स्टार आता कायमचा गायब झाला आहे. (op sharma show) जादूच्या जगाच्या अभिनेत्याने वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना कानपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने जादूच्या जगताचं मोठं नुकसान झालं आहे. (op sharma magic )
कोरोनाच्या काळापासून ते आजारी होते. ओपी शर्मा यांचा जन्म 1973 मध्ये झाला होता आणि ते मूळचे बलियाचे होते. आपल्या जादूमुळे ओपी शर्मा यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. ओपी शर्मा हे जादूच्या दुनियेचे राजा होते. (jadugar op sharma ka jadu)
परफॉर्मन्ससाठी ते कुठेही गेले तरी दीडशेहून अधिक लोकांचा ताफा त्यांच्यासोबत असायचा. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलेही होती. ओपी शर्मा यांनीही आपल्या जादूद्वारे समाजात जनजागृती केली. पण आज त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांवर दुखाःचं डोंगर कोसळलं आहे. (op sharma team)
ओपी शर्मा निधनाने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. लोक त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. ओपी शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मीनाक्षी शर्मा, त्यांची तीन मुले प्रेम प्रकाश शर्मा, सत्य प्रकाश शर्मा आणि पंकज शर्मा आणि मुलगी रेणू यांचा समावेश आहे. (jadugar op sharma)
ओपी शर्मा यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना लहानपणापासूनच जादूगार बनण्याची आवड होती. ओपी शर्मा यांनी राजकारणातही हात आजमावला होता.त्यांनी सपाच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती.