मुंबई : प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट (makeup artist) पंढरीदादा जुकर  (Pandhridada Jukar) यांचे आज मुंबईत निधन झाले. वयाच्या ८८ वर्षी त्यांचे निधन झाले. ते अभिनेत्री  माधुरी दीक्षितचे आवडते रंगभूषाकर होते. सिनेविश्वात अनेक आधुनिक मेकअप तंत्राचा पायंडा त्यांनी रोवला. जवळपास  ६० वर्षे ते रंगमंच, मोठा पडदा आणि छोटा पडदा या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा मेक अप करत होते. ते सर्वांचे आवडते होते. त्यांना पंढरीदादा या नावाने खास ओळखले जायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ रंगभूषाकार अशी ओळख असणारे पंढरीदादा जुकर हे राजकमल कला मंदिर, यशराज फिल्मस्, बालाजी टेलिफिल्म्स या आणि अशा अनेक प्रॉडक्शन हाऊससाठी त्यांनी काम केले आहे. संगीत सिनेमा येण्याआधीही त्यांनी ब्लॉक अॅण्ड व्हाईट सिनेमासाठी  मेक अप  आर्टीस्ट म्हणूनही काम पाहिले आहे.


प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला, मीनाकुमारी यांच्यापासून ते जुही चावला, माधुरी दीक्षित यांच्या पर्यंत अनेक अभिनेत्रींचा आणि अभिनेत्यांमध्ये राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर यांचाही मेकअप पंढरीदादांनी मेक अप केला आहे. 


२०१३ मध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते.. रंगभूषा म्हणजे फक्त चेहऱ्याला रंग लावणे नाही तर त्यात पात्राचे व्यक्तिमत्त्व रंगभूषेतून उभे राहिले पाहिजे, असे ते नेहमी सांगत. त्याप्रमाणे ते रंगभूषेवर काम करत असत.