पंजाब : प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका गायकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी देखील दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पंजाबमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधील आणखी एक गायक मनकिरत औलखला धमकी मिळाली आहे. आता मनकिरत औलख हा गुंडाच्या निशाण्यावर आहे. गौंडर एंड ब्रदर्स नावाच्या फेसबुक पेजने मनकिरत औलखला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा आरोप करत परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. 


मनकिरत औलख यांना यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. मनकिरत औलखला पोलिसांनी या धमकीनंतर संरक्षण दिलं आहे. ही धमकी कोणाकडून आली याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही. 


सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर अनेक गोष्टींचा हळूहळू उलगडा होत आहे. बलकौर सिंह यांनी दावा केला की लॉरेंस बिश्नोई गँगने त्यांच्या मुलाची म्हणजे सिद्धू मूसेवालाची हत्या केली. ही गँग सतत सिद्धूला धमक्या देत असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. आता पोलीस या प्रकरणी तपास करत आहे.  


पंजाबमधील लोकप्रिय गायक असलेला सिद्धू मूसेवालाची (sidhu moosewala) गोळी घालून हत्या करण्यात आली. सिद्धूवर मनसाइथील जवाहर गावाजवळ गोळीबार करण्यात आला.  


या गोळीबारानंतर सिद्धूला  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात  सिद्धूला मृत घोषित करण्यात आलं. तर त्याच्यासोबत असलेल्या तिघांवरही गोळीबार झाला. यामध्ये तिघे जखमी झाले. या तिघांवर मानसा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.