मुंबई : भाऊ कदम हे मराठीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते आहेत. फु बाई फू या कार्यक्रमातून भाऊ घरा-घरात पोहचले. मात्र भाऊ यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे चला हवा येवू द्या या कार्यक्रमातून. भाऊ कदम आपल्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगसाठी ओळखले जातात. मराठीच्या टॉप कॉमेडी अभिनेत्यांमध्ये भाऊ यांचं नाव घेतलं जातं. नुकतेच भाऊ यांनी त्यांच्या पत्नीसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला. अवघ्या काही वेळातच भाऊ यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. अनेकांनी त्यांच्या जोडीचं कौतुक केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आज आम्ही तुम्हाला या कॉमेडी किंगच्या लव्हस्टोरीविषयी सांगणार आहोत. भाऊकडे पाहता हा अभिनेता जेवढा स्क्रिनवर खोडकर दिसतो तेवढाच तो खऱ्या आयुष्यात शांत आहे असं अनेकदा आपण ऐकलं आहे. पण भाऊ कदमचं लव्हमॅरेज झालंय हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेलं ना. तर होय खरंच या अभिनेत्याचं लव्हमॅरेज झालं आहे. मात्र जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबतच लग्न करुन भाऊ यांनी सुखाचा संसार केला. आज आम्ही तुम्हाला भाऊ यांच्या लव्हस्टोरीविषयी सांगणार आहोत. 


झी मराठीवरील 'कानाला खडा' या कार्यक्रमात स्वत: अभिनेत्याने याबाबत उलगडा केला होता. या कार्यक्रमात आपल्या पत्नीला कसे प्रपोज केले आणि तिचा नक्की कोणता स्वभाव आवडला याबाबत त्यांनी खुलासा केला होता. भाऊ कदम आपल्या पत्नीची शिकवणी घेत होते आणि त्यानंतर तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडून त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली होती.  


१० वी मध्ये एका विषयात नापास झाल्याने भाऊ कदम यांच्याकडे ती शिकायला यायची आणि आपण तिला चांगला चोप दिला आहे असंही त्यांनी सांगितलं.ममताला भाऊ कदम बरेच वर्ष ओळखत होते आणि इतर मुलींप्रमाणे ती नव्हती तर अगदी गृहिणी आणि आपल्याला हवी तशी शांत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. बाहेर जाऊन गप्पा मारत राहणं अथवा चारचौघींबाबत वाईट बोलत राहणं यामधली ही मुलगी नाही हे हेरून त्यांनी आपल्या पत्नीला लग्नाची मागणी घातली.


ममताला याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, त्यांचा शांत स्वभाव तिला आवडत होता. पण मागणी घातल्यानंतर २-३ दिवस विचार करायला घेतले होते. घरी आई-बाबांना विचारूनच लग्नाला होकार दिल्याचे भाऊ यांच्या पत्नीने सांगितलं.



भाऊ कदम नेहमीच आपल्या पत्नीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. तर दोघांच्याही कुटुंबाच्या मर्जीने लग्न केलं आणि भाऊ कदम यांच्या पत्नीने त्यांच्या पडत्या काळापासून त्यांना कायम साथ दिली आहे.भाऊ कदम आणि त्यांची पत्नी यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे आणि या तिन्ही मुलांना वळण लावण्याचं आणि कायम सांभाळण्याचं काम आपली पत्नी उत्तम करते हे भाऊ कदम अभिमानाने सांगतात. भाऊ यांच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमी त्यांच्या चाहत्यांना आवडतं.