प्रसिद्ध गायिकेला कधीच आई व्हायचं नाही; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का
नेहा भसीनला आता बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.
मुंबई : सुपरबोल्ड गायिका नेहा भसीन तिच्या गाण्यांपेक्षा आणि म्युझिक व्हिडिओंपेक्षा तिच्या हॉट स्टाइलमुळे चर्चेत असते. अनेकदा नेहा भसीनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात. जे ती स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नेटिझन्ससोबत शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये नेहाची बोल्ड आणि बिंधास्त स्टाइल पाहायला मिळत असते.
नेहा भसीनला आता बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. अनेक उत्कृष्ट गाण्यांना आवाज देणारी नेहा बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर आणखीनच लोकप्रिय झाली आहे आणि आज तिची गाणी प्रत्येक मुलाच्या ओठावर पाहायला मिळत आहेत. अलीकडे, नेहाने 40 व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये खूप मजा केली, त्यानंतर तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलू उघड केले. ज्यामध्ये तिने काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे नेहाला कधीच आई व्हायचं नव्हतं.
लग्नाला 6 वर्षे झाली आहेत
गायिका नेहा भसीन तिच्या गायनासाठी खूप लोकप्रिय आहे, पंजाबच्या लोकगीतांना नवीन शैली देऊन तिने त्यांना घराघरात प्रसिद्ध केलं, तर काही बॉलिवूड हिट गाण्यांमध्ये तिचा आवाज खूप लोकप्रिय होता. पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर नेहाचं लग्न 6 वर्षांपूर्वी झालं होतं पण आजतागायत ती आई बनलेली नाही. आणि अलीकडेच, जेव्हा तिला भविष्यात बाळाच्या नियोजनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नेहाने स्पष्टपणे सांगितलं की तिला कधीही आई व्हायचं नाही, उलट ती यापेक्षा काहीतरी मोठं नियोजन करते.
ही नेहा भसीनची मनापासून इच्छा आहे
खरंतर नेहाला स्वतःची मुलं व्हावीत असं वाटत नाही, तर नेहमीच तिला एक मूल दत्तक घ्यायचं होते, पण आता ती त्याहून मोठी योजना आखत आहे. वास्तविक, नेहाला एक अनाथाश्रम उघडायचा आहे ज्यामध्ये तिला किमान 10-12 मुलांची काळजी घ्यायची आहे त्यांना शिकवायचं आहे आणि त्यांच्यासाठी नवीन जीवन सुरू करायचं आहे. त्याचबरोबर तिने या दिशेने कामही सुरू केलं आहे. एक-दोन वर्षांत ती यावर काम करणार आहे.