`तुझा आधार कार्डवरचा फोटो अपलोड कर ना`; फॅनच्या रिक्वेस्टवर श्रद्धा म्हणाली, `त्यात एवढी...`
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावरील पोस्टवर फॅनच्या विनंतीवर उत्तर देत म्हणाली...
Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'स्त्री 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या चित्रपटानं भारतात बॉक्स ऑफिसवर 547.25 कोटींची कमाई केली आहे. श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. ज्यावर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. या सगळ्यात श्रद्धा कपूरनं एका नेटकऱ्याला उत्तर दिलं आहे.
श्रद्धा कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक थ्रोबॅक फोटोचा कोलाज शेअर केला होता. या फोटोत ती चित्रपट निर्माता दिनेश विजान यांच्यासोबत दिसत होती. तर दुसऱ्या फोटोत ‘स्त्री’ फ्रेंचायझीचे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यासोबत दिसत आहे. खरंतर हे फोटो 2028 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ च्या शूटिंग दरम्यानचा आहे. हा फोटो शेअर करत श्रद्धा कपूरनं कॅप्शन लिहिलं की स्त्री दरम्यान, आमच्या स्त्री आणि स्त्री 2 ला सुपर डुपर ब्लॉकबस्टर निर्माता आणि दिग्दर्शकांसोबत आहे. मला माझ्या कमाल, अप्रतिम आणि उत्तम चित्रपटांमध्ये घेण्यासाठी दिनेश आणि अमर कौशिकचे आधार. श्रद्धा कपूरनं हा कोलाज शेअर केला आणि पोस्टवर कमेंटचा वर्षाव होऊ लागला.
कमेंट सेक्शनमध्ये एका फॅननं श्रद्धा कपूरला आधार कार्डचा फोटो अपलोड करण्याचा सल्ला दिला. त्यावर उत्तर देत श्रद्धानं मजेशीर उत्तर दिलं आहे. चाहत्यानं कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं की तुझ्या आधार कार्डचा फोटो अपलोड कर. त्यावर श्रद्धा कपूर रिप्लाय देत म्हणाली, 'त्यात मी इतकी सुंदर दिसते, ते तू सहन करू शकणार नाही.' आणखी एका नेटकऱ्यानं श्रद्धाच्या पोस्टवर कमेंट करत विचारलं 'तू झोपली नाहीस... स्त्री कधी झोपते?' याचं उत्तर देत श्रद्धा म्हणाली, 'आता 50 टक्के झोपले तर आहे मी.'
हेही वाचा : दीपिकाची Delivery Date समोर येताच, चाहत्यांनी शोधलं रणबीर कपूर कनेक्शन
श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ चे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. हा चित्रपट 2018 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'स्त्री' चा सीक्वल आहे. श्रद्धा कपूरची जोडी त्या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसली होती. त्याशिवाय तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि अभिषेक बॅनर्जी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.