Deepika Padukone Delivery Date Connection With Ranbir Kapoor : सप्टेंबर महिन्याला आज सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चाहत्यांना आनंद हा आणखी वाढला आहे. त्याचं कारण म्हणजे दीपिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती सप्टेंबर महिन्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना खूप जास्त उत्सुकता आहे कारण त्यांना दीप-वीरच्या बाळाची पहिली झलक पाहायची आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर एक गोष्ट चांगलीच चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे दीपिका कोणत्या तारखेला आई होणार आहे त्याची. मात्र, या सगळ्यात दीपिका आणि रणवीरच्या बाळाचं आणि रणबीर कपूरचं कनेक्शन जोडण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे कनेक्शन.
खरंतर न्यूज 18 च्या रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदकोण ही मार्च 2025 पर्यंत मॅटरनिटी लीव्हवर असेल. तर दीपिका मुंबईतच तिच्या बाळाला जन्म देणार आहे. प्रेग्नंसीचा आनंद घेत दीपिकानं कामातूनही आता ब्रेक घेतला आहे. तर दीपिका 28 सप्टेंबर रोजी बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता ही खूप वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे 28 सप्टेंबरला रणबीर कपूर हा त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या तारखेवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.
बाळाच्या जन्मानंतर रणवीर आणि दीपिका हे दोघेही वांद्रे येथे असलेल्या त्यांच्या नव्या लग्झरीयस अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जाते. तर हे दोघं लवकरच शाहरुख खानचे शेजारी होणार आहेत.
हेही वाचा : रणबीर कपूर पुढला अमिताभ होईल का? जावेद अख्तर हसत म्हणाले, 'मी त्याच्यासाठी...'
दीपिका आणि रणवीर सिंग विषयी बोलायचं झालं तर ते दोधं 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम लीला या चित्रपटाच्या सेटवर भेटले. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यांच्यातील जवळीकता वाढली. 2018 मध्ये दीपिका आणि रणवीरनं लग्न केलं. या वर्षाच्या सुरुवातीला अर्थात फेब्रुवारी महिन्यात दीपिका आणि रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. त्याशिवाय त्यांनी खुलासा केला की सप्टेंबर महिन्यात दीपिका ही बाळाला जन्म देणार आहे.