Vidya Balan At Pankaj Udhas Funeral: अभिनेत्री विद्या बालनबरोबर नुकताच एक विचित्र प्रकार घडला. पंकज उधास यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी विद्या बालन उधास कुटुंबियांच्या घरी पोहोचली होती. मात्र यावेळेस एका चाहत्याने बळजबरीने विद्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण घटनाक्रम तेथे उपस्थित असलेल्या कॅमेरामन्सच्या कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. या घटनेदरम्यान विद्याने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यावरुन तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होतोय.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्या बालन पंकज उघास यांच्या घरी पोहोचली आणि चालत त्यांच्या घराकडे जात होती त्यावेळेस वाटेत एका अती उत्साही चाहत्याने तिच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न केला. विद्या बालनसोबत असलेल्या महिलेने या चाहत्याला तिच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ पाहिल्यास विद्याला या चाहत्याला सेल्फी काढू देण्यात अजिबात रस नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. असं असतानाही हा चाहता बळजबरी करुन सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विद्या बालनच्या टीमने या चाहत्याला तिच्या जवळ येऊ दिलं नाही. मात्र विद्याने आपला संयम कायम ठेवला आणि ती चालत राहिली. विद्याच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. 


अनेकांनी या चाहत्याला झापलं


विद्याच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करुन एखाद्याच्या अंत्यसंस्काराला आलेल्या सेलिब्रिटीबरोबर सेल्फी काढणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या व्यक्तीला कॉमन सेन्स नाही का असा प्रश्न काहींनी विचारला आहे. तर काहींनी हा चाहता हसत हसत विद्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याच्या मुद्द्यावरुन त्याला झापलं आहे. काहींनी या चाहत्याने अक्कल गहाण टाकली आहे की काय? अशा आशयाच्या प्रतिक्रिया नोंदवल्याचं दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Snehkumar Zala (@snehzala)


गझलचा आवाज हरपल्याची भावना


पंकज उधास यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार झाले. विद्या बालनबरोबरच इतरही अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. यामध्ये तबलावादक झकीर हुसैन, गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनीही उपस्थिती लावून पंकज उधास यांना अखेरचा निरोप दिला. पंकज उधास यांचं 26 फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. यासंदर्भातील माहिती त्यांच्या मुलीनेच जाहीर केली. पंकज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जवळचे मित्र आणि गायक अनुप जलोटा यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी पंकज यांना पॅनक्रीएटीक कॅन्सर असल्याचं निष्पण्ण झालं होतं. मागील काही काळापासून यासंदर्भातील उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंकज उधास यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील गझलने आपला आवाज हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्या.