मुंबई : बंगाली अभिनेत्री नुसरत जहां सध्या तिच्या गर्भावस्थेमुळे बरीच चर्चेत आहे. याआधी नुसरतचा गर्भवती असल्याचा अंदाज वर्तविला जात होता पण आता नुसरतने स्वत: बेबी बंपसह फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. नुसरत जगाची पर्वा न करता आपलं सोशल मीडिया अकाऊंट नियमितपणे अपडेट करते, पण यादरम्यान तिच्या चाहत्यांनी असं काहीतरी पाहिलं जे चर्चेत आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुसरतच्या फोटोंची खास झलक
नुकतीच नुसरत जहांने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतने पांढरा टीशर्ट घातला आहे. ज्यामध्ये तिचा बेबी-बंप लपलेला दिसत आहे. नुसरतने मोठा सनग्लासेस घातला असून एक व्यक्ती या मोठ्या सनग्लासेसमध्ये फोटो काढताना दिसत आहे.



फोटो होऊ लागले व्हायरल 
हे फोटो शेअर केल्यावर नुसरतच्या चाहत्यांनी असा अंदाज लागायला लागला की फोटो काढणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन, तिचा बॉयफ्रेंड यश आहे. नुसरतने फोटो शेअर करताच लगेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.


लग्नामुळे वादात
नुसरत जहां यांनी पती निखिल जैन यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितलं होतं की, दोघांनी आपले रस्ते वेग-वेगळे निवडले होते. तिने सांगितलं की, तुर्कीमधील त्यांचं लग्न देशात अवैध आहे, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्न उद्भवत नाही. काही दिवसांपूर्वी नुसरतने निखिल जैनसोबतचे काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवरून डिलीट केले होते. तर दुसरीकडे निखिल जैन यांनी एक निवेदन जारी केलं होतं की लग्नानंतर लगेजच नुसरतची मनोवृत्ती बदलली आणि तिने देशात लग्न नोंदणी करण्यास तिने नकार देण्यास सुरुवात केली.