मुंबई : फक्त सैफ अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खानच नाही तर  पतौडी घराण्यातील  6 वर्षीय तैमूर अली खान जशी एंट्री मारतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होतात. तैमूर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. कधी तो खेळताना दिसतो तर कधी पेंटिंग करताना दिसतो, पण सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तैमूरने कार राईड करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर अली खानचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये पसंत केला जात आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर कार चालवताना दिसत आहे. इतकंच नाही तर तो ज्या स्टाईलमध्ये कार चालवत आहे ते पाहून चाहतेही त्याच्या स्टाईलचे दिवाने झाले आहेत.  एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं की, भाऊ, सवारी कुठे आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने 'स्मार्ट बॉय' अशी कमेंट केलीये. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तैमूर अली खानचा जन्म 20 डिसेंबर 2016 रोजी झाला होता. तेव्हापासून तैमूर कधी त्याच्या नावामुळे तर कधी त्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आला आहे.  तैमूरला जेह अली खान नावाचा भाऊ देखील आहे.