मुंबई : चंदीगडच्या हरनाज संधूने वयाच्या 21 व्या वर्षाी मिस युनिव्हर्स 2021 ही स्पर्धा जिंकून भारताचं नाव यशाच्या उंचीवर पोहचवलं होतं.  ही स्पर्धा जिंकल्यानंतर हरनाजचं नाव जगभर गाजलं. त्याचबरोबर, हरनाज मिस युनिव्हर्स 2021 बनली तेव्हा संपूर्ण देशाने एकत्र हा उत्साह साजरा केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनाज कौर संधू, मिस युनिव्हर्स 2021 होती, नुकताच तिने यावर्षीचा म्हणजेच २०२३ चा संयुक्त राज्य अमेरिका की आर'बोनी गेब्रियलला मिस यूनिवर्सचा ताज दिला. यावेळी ती खूपच भावूक होताना दिसत होती. मिस युनिव्हर्सच्या रुपात स्टेजवर चालताना दिसल्यावर संधूने आपले अश्रू रोखण्याचा खूप प्रयत्न केला. काळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केलेली हरनाज संधू स्टेजवर आल्यावर तिचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी स्पर्धकांनी तिच्यासाठी उत्साहाने टाळ्या वाजवल्या.  मात्र हरनाजला पुन्हा एकदा पाहिल्यावर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसतोय. आणि यामगचं कारण म्हणजे तिचं वाढलेलं वजन


हरनाजला आजही चाहत्यांचं अपार प्रेम मिळतं. पण मिस युनिव्हर्स 2021 बनल्यानंतर हरनाजचा हा बदलेला लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मिस युनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हरनाजचं वजन खूप वाढलं आहे. त्याचबरोबर ती तिच्या वाढलेल्या वजनामुळे खूप चर्चेत आहे. तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती सध्या बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे


वाढत्या वजनामुळे ट्रोल होण्याची हरनाजची ही काय पहिलीच वेळ नाही. याआधीही हरनाज बऱ्याचदा ट्रोल झाली आहे. याआधी ट्रोल करण्यांना प्रत्युत्तर देताना हरनाजने  पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'मी माझ्या शरीराचा आदर करते. मला सेलिआक आजार आहे, मला बॉडी शेमिंग आवडत नाही. लोकांना माहित नाही की मला ग्लूटेनची ऍलर्जी आहे. मला स्टिग्मा ब्रेक करायला आवडतं. हरनाजच्या उत्तरावरून हे स्पष्ट झालं आहे की, तिचं वजन अचानक वाढण्याचे कारण सेलिआक आजार आहे. 



युनायटेड स्टेट्सच्या आर'बोनी गॅब्रिएल हिला मिस युनिव्हर्स 2022 चा किताब देण्यात आला, व्हेनेझुएलाच्या अमांडा डुडामेल ही पहिली रनर अप आणि डोमिनिकन रिपब्लिकची अँड्रिया मार्टिनेझ दुसरी रनर अप होती.


हरनाज संधूने जवळपास दोन दशकांनंतर 2021 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब भारतात परत आणला. हरनाज संधूच्या आधी, फक्त दोन भारतीयांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता - 1994 मध्ये सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता