मुंबई :  अभिनेता रणबीर कपूर सध्या तुफान चर्चेत आहेत. रणबीर त्याच्या अभिनयामुळे तर अनेकांना आवडतो, पण त्याचं फुटबॉलवर असलेलं प्रेम त्यांच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांमध्ये फुटबॉलची खूप क्रेझ आहे. सध्या रणबीर दुबईमध्ये अमीरात यूनायटेडसोबत सेलिब्रीटी फुटबॉल खेळत आहे. यावेळी त्याच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अभिषेक बच्चन सारखे सेलिब्रिटीही फुटबॉल क्लबमध्ये सामील आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या सर्व सेलिब्रिटींमध्ये रणबीर तुफान चर्चेत आहे. त्याला कारण देखील तसचं आहे, रणबीरला स्टेडिअमवर पाहाताचं चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.  सध्या त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक चाहते रणबीरवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. 


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणबीरला पाहून मुली "I Love You" म्हणू लागल्या. तेव्हा रणबीरने देखील त्यांच्या भावनांना उत्तर देत 'I Love you' अशी प्रतिक्रिया दिली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रणबीर कपूरच्या आगामी  सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर पत्नी आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 


याशिवाय रणबीर करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'शमशेरा', लव रंजनचा अनटायटल सिनेमा आणि संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या सिनेमात दिसणार आहे.