मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनचं नाव काही नवं नाही. 'पुष्पा' या चित्रपटामुळे तर तो संपूर्ण देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. फक्त दक्षिणेकडच्या राज्यांमध्येच नव्हे, इथे मुंबईतही त्याच्या लोकप्रियतेनं परमोच्च शिखर गाठलं. (Fans gets angry on pushpa fame actor allu arjun viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरव्ही चाहत्यांमध्येच वावरणारा हा अभिनेता मात्र आता मुंबईत आल्यानंतर काहीसा बदललेला दिसत आहे. त्याचं हे रुप चाहत्यांसाठीसुद्धा अनपेक्षित असल्यामुळं आता त्यांचाही संताप अनावर गेला आहे.


कारण ठरत आहे ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये हा अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत दिसत आहे. डोक्यावर काळी डोपी, काळा टीशर्ट आणि पँट आणि सनग्लासेस असा त्याचा एकंदर लूक व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


आता अल्लू अर्जुन आला म्हटल्यावर त्या ठिकाणी बघ्यांची आणि चाहत्यांची गर्दी होणार हे स्वाभाविक. इथं मुंबईतही हेच झालं. तो येताच छायाचित्रकारांनीही फोटो टीपण्यासाठी म्हणून गर्दी केली. काहींनी अभिनेत्याला त्याच्या नावानं हाका मारण्यास सुरुवात केली. 


अल्लू अर्जुन मात्र वेगळ्याच मनस्थितीत दिसला. चाहत्यांकडे पाहून अभिवादन करणं दूर, पण तो फोटोसाठीही उभा राहिला नाही. त्यानं तिथं असणाऱ्या कोणाकडे पाहिलंसुद्धा नाही. अल्लू अर्जुनचं हे वागणं अनेकांनाच खटकलं. 



मुंबईकरांनी तर, 'ए बिड्डा ये मेरा अड्डा' अशा शब्दांत अल्लू अर्जुनला त्याच्याच चित्रपटातील गाण्याच्या ओळीचा वापर करत सुनावलं. चाहत्यांची ही नाराजी आता तो नेमका कसा दूर करतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.