मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मौनीने बॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची जादू दाखवली. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मौनी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आता देखील तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्स वर्षाव होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चाहत्यांनी मौनी रॉयच्या किलर लूकचं कौतुक केलं आहे. मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवंनवीन शेअर करत राहते. अलीकडेच तिने तिचे काही बोल्ड ड्रेसमधील फोटो शेअर केले जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.




 मौनी रॉयच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचं झालं तर 18 लाखांहून अधिक लोक केवळ इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला फॉलो करतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मौनी रॉय टीव्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिने 2006मध्ये 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही शोद्वारे छोट्या पडद्यावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.



यानंतर तिने देवों के देव ... महादेव, जुनून, जरा नच के दिखा, पति पतनी और वो आणि नागिन सारख्या मालिकांमध्ये काम केलं. टीव्ही शो नागिनद्वारे तिने बरीच लोकप्रियता मिळवली. याशिवाय मौनी रॉयने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मौनी गोल्ड, रन, केजीएफ आणि मेड इन चाइना  सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली आहे.