Daaku Maharaj : साउथ फिल्म 'डाकू महाराज' या चित्रपटातील दबिड़ी दिबिड़ी हे गाणं नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात उर्वशी रौतेलाने चित्रपटातील मुख्य अभिनेता नंदामुरी बालकृष्णासोबत डान्स करताना दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर या गाण्याला चाहते अश्लील गाणं असल्याचं म्हणत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशी रौतेलाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून  'डाकू महाराज' या चित्रपटातील दबिड़ी दिबिड़ी हे गाणं रिलीज केल्याची घोषणा केली होती. या वेळी तिने कॅप्शनमध्ये म्हटले होते की, आमच्या मेगा पीरियड ड्रामा फिल्म 'डाकू महाराज' मधील विद्युतीकरण करणाऱ्या दबिड़ी दिबिड़ीचे हे संपूर्ण गाणं आहे. थमन आणि नंदामुरी बालकृष्णा यांचे मास ऑफ गॉड म्युझिक ही नवीन वर्षाची उत्तम भेट आहे. या गाण्याचा आनंद घ्या आणि उत्सव साजरा करा. असं तिने म्हटले आहे. 


दबिड़ी दिबिड़ी गाण्यावरील उर्वशीचा डान्स पाहून चाहते भडकले 


उर्वशी रौतेलाच्या दबिड़ी दिबिड़ी गाण्यावरील डान्स पाहून चाहते भडकले आहेत. अभिनेत्रीच्या या गाण्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यामध्ये काही चाहत्यांनी या डान्सला अभद्र असे म्हटले आहे. तर काही चाहत्यांनी त्यांच्या वयातील अंतर आणि त्यांच्या परस्परसंवादाचे स्वरूप देखील लिहिले आहे. तर काही चाहत्यांनी हे गाणं काढून टाकण्याची किंवा पुन्हा शूट करण्याची मागणी केली आहे. या गाण्यातील अश्लील डान्समुळे नवा वाद देखील सुरु झाला आहे. 



अशातच एका चाहत्याने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, मी पृथ्वीवर काय पाहिलं? एक प्रौढ माणूस एखाद्या व्यक्तीसोबत इतका अयोग्यपणे नाचत आहे. नायकाने हे का मान्य केले? पूर्णपणे घृणास्पद.


डाकू महाराज या दिवशी होणार रिलीज 


बॉबी कोल्ली दिग्दर्शित 'डाकू महाराज' या चित्रपटात बालकृष्णा डाकूच्या भूमिकेत दिसत आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या टीझरमध्ये नंदामुरी बालकृष्णाला अशा प्रकारे दाखवले आहे की, यापूर्वी त्याला असे कधीही पाहिले नाही. याचित्रपटात अभिनेता बॉबी देओल, उर्वशी रौतेला, प्रज्ञा जैस्वाल आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्यासह इतर कलाकार देखील असणार आहेत. 'डाकू महाराज' हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.