Anushka Sharma Pregnant Video : वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) निमित्तानं विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. किंबहुना तो अपेक्षित अशी कामगिरी करत काही विक्रमांनाही गवसणी घालत आहे. पण, या साऱ्यामध्ये तो कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसतोय. शक्य असेल तेव्हा विराट त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मालाही वेळ देतोय. त्यामागचं कारणही तसच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण, या चर्चा जितक्या वेगानं उठल्या, तितक्याच वेगानं त्या शांतही झाल्या. आता मात्र या चर्चांना पुन्हा वाव मिळाला आहे, किंबहुना अनुष्का पुन्हा आई होणार असल्याच्या गोष्टीला दुजोरा देणारा एक व्हिडीओच समोर आल्यामुळं बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यात नेटकऱ्यांनीही हा व्हिडीओ वारंवार पाहत, शेअर करत या जोडीला थेट शुभेच्छाच देण्यास सुरुवात केली. 


जानेवारी 2021 मध्ये अनुष्का आणि विराटच्या नात्यात एका चिमुकलीचा प्रवेश झाला आणि तिच्या येण्यानं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. ज्यानंतर आता अनुष्का पुन्हा गरदोर असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच काय, तर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कपच्या तयारीत असताना विराटनं त्यातूनच वेळ काढत माघारी येत अनुष्काची भेटही घेतल्याचं म्हटलं गेलं. तत्पूर्वीच ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ज्यानंतर आता हा नवा व्हिडीओ समोर आला. जिथं विरुष्का एकमेकांसोबत फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. 



 


बेबी बम्प लपवूनही... 


काळ्या रंगाचा एक सुरेख घेरदार शॉर्ट ड्रेस अनुष्कानं यावेळी घातला होता. तिच्या चेहऱ्यावर Pregnancy Glow काही केल्या लपत नव्हता. तर, वारंवार हातानं ती Baby Bump कोणाच्याही लक्षात येणार नाही, अशाच पद्धतीनं लपवताना दिसली. पण, चाहत्यांनी मात्र ही बाब हेरली आणि क्षणात हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. अनुष्कासोबत असणारा विराट यावेळी ओव्हरसाईज ग्रे टी-शर्टमध्ये दिसला. काळ्या रंगाची टोपी आणि पांढके स्निकर्स त्याचा लूक उठावदार करत होते.