Salman Khan: सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. 90च्या काळात सलमान खान प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. 1989 साली आलेल्या मैने प्यार किया या चित्रपटानंतर त्याचे करिअर पूर्णपणे बदलले. या चित्रपटातील चॉकलेट लुक आणि रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला होता. मात्र तुम्हाला माहितीये का मैने प्यार किया या चित्रपटात सलमान खान निर्मात्यांची पहिली पसंत नव्हता. तर, दुसऱ्या एका अभिनेत्याला निवडण्यात आले होते. मात्र, त्या अभिनेत्याच्या एका आजारामुळं सलमान खानचे नशीब उजळले आणि त्याला हा चित्रपट मिळाला. या अभिनेत्याचे नाव फराज खान असं असून त्याने 90च्या दशकात अनेक सुपरहिट फिल्म दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IMDBच्या ट्रिवियानुसार, मैने प्यार किया चित्रपटात सलमान खानच्या भूमिकेसाठी फराज खान यांना निवडण्यात आले होते. मात्र, त्यांना झालेल्या एका गंभीर आजारामुळं त्याला या चित्रपटातून बाहेर पडावे लागले. फराज खान यांनी मेहंदी, फरेब आणि बनू मै तेरी दुल्हनसारख्या चित्रपटांत काम केले होते. त्यांच्या या चित्रपटातील भूमिका खूप जास्त लोकप्रिय झाल्या होत्या. इतकंच नव्हे तर टिव्ही कार्यक्रमातही त्यांनी काम केले होते. मात्र, 2020मध्ये वयाच्या 50व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Fahmaan Khan (@fahmaankhan)


फराज खान हे अभिनेते युसूफ खान यांचे पुत्र होते. तर फहमान खान त्यांचे सावत्र बंधू आहेत. फहमान खान यांनी त्यांच्या भावाच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही जुने व्हिडिओ आणि फोटोदेखील आहेत. तर, त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नेहमीच आमच्यासोबत आहात. आमच्या हृदयात तुम्ही नेहमीच जिवंत असाल. मला तुमची खूप आठवण येते. मात्र मला माहितीये की तु जिथे कुठे असशील तिथे आनंदात असशील. कधीकधी आम्हाला असं धावताना पाहून तु म्हणतदेखील असशील 'हाहा रन फॉरेस्ट रन' मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.