Farah Khan on Happy New Year : कोरियोग्राफर आणि चित्रपटनिर्माती फराह खानचं युट्यूब चॅनल देखील आहे. त्यावर फराह तिच्या वेगवेगळ्या स्किल्स दाखवते आणि मुलाखती घेताना दिसते. फराह खानचे व्लॉग्स हे नेहमीच चर्चेत असतात. तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.  दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं खुलासा केला की तिला 10 कोटींची ऑफर देत एका निर्मात्यानं त्यांच्या मुलाला कास्ट करण्याची ऑफर दिली होती. मात्र, तिनं त्या ऑफरला नकार दिला आणि नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवानला कास्ट केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फराह खानची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती तिचा चित्रपट 'हॅप्पी न्यू ईयर' विषयी बोलताना दिसते. त्यात ती म्हणाली की कशा प्रकारे एकदा एका निर्मात्यानं त्याच्या मुलाला कास्ट करण्यासाठी फराहला 10 कोटींची ऑफर दिली होती. कॉमेडियन आणि लेखक जाकिर खाननं पुढच्या मुलाखतीत फराहनं या घटनेला आठवलं. जेव्हा निर्मात्याच्या जागी नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठव शाह यांचा मुलगा विवान शाह यांना कास्ट केलं होतं. 



याविषयी सांगत फराह खान म्हणाली, 'तुम्हाला विश्वास होणार नाही, पण हॅपी न्यू ईयर दरम्यान, एका निर्मात्यानं मला त्याच्या मुलाला कास्ट करण्यासाठी 10 कोटींची ऑफर दिली. झासीची राणी असल्यानं मी सांगितलं, मी असं कधी करणार नाही. मी चित्रपट आणि त्याच्या कथेला धोका देणार नाही. जर शाहरुखला कळलं की त्याला चित्रपटात कास्ट करण्यासाठी मी 10 कोटी घेतले? कधीच नाही, मी असं करणार नाही. मी विवान शाहला कास्ट केलं कारण, मला वाटलं की तो त्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे.'


हेही वाचा : 'तो आधी दुधवाला होता...'; अक्षय कुमार पहाटे लवकर उठण्यावरून अजय देवगणनं उडवली खिल्ली


फराह खानच्या हॅपी न्यू ईयर या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, विवान शाह आणि बोमन ईरानी हे कलाकार होते. हा त्या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. फराहचा दिग्दर्शक म्हणून हा शेवटचा चित्रपट होता त्यानंतर तिनं कोणत्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही. फराह खाननं आजवर 'मैं हूं ना', 'ओम शांति ओम' आणि हॅपी न्यू ईयर या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या तिन्ही चित्रपटांमध्ये शाहरुख खान हा महत्त्वाच्या भूमिकेत होता. फराह खान सध्या सलमान खानसोबत मिळून आगामी चित्रपट 'सिकंदर' साठी एक हाय एनर्जी ट्रॅक तयार करत आहे.