सोमवारी लग्न झालं, बुधवारी कपल थेरेपीला पोहोचले फरहान अख्तर आणि शिबानी
Farhan Akhtar and Shibani Dandekar : फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Farhan Akhtar and Shibani Dandekar : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनं 2022 मध्ये सुत्रसंचालक आणि अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्न केलं. त्याआधी त्यानं अधुना भबानीसोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यादोघांना दोन मुली असून शाक्य आणि अकीरा अशी त्यांची नावं आहेत. लग्नाच्या 16 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचं ठरवलं. घटस्फोटानंतर फरहान हा शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आला. दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या काळात अनेकदा थेरेपी सेशन घेतले होते. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी रिलेशनशिपमध्येनंतर लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतरही ते दोघं थेरेपिस्टकडे गेले होते. त्यांना त्यानंतरही थेरेपिस्टची गरज पडली होती.
शिबानी दांडेकरनं अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना शिबानी म्हणाली की लग्नाच्या काही तासांमध्ये दोघं थेरेपी घेण्यासाठी पोहोचले तेव्हा थेरेपिस्टला देखील धक्का बसला होता. दरम्यान, सोमवारी दोघांनी लग्न केलं होतं आणि बुधवारी लगेच त्यांनी थेरेपिस्टची अपॉइंटमेंट घेतली होती. दोघं थेरेपिस्टकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की 24 तासांपूर्वीचं त्यांचं लग्न झालं आहे, तर तुम्ही दोघं इथे का आलात?
शिबानीनं सांगितलं की कपल थेरेपी घेणं एकाप्रकारे जिमला जाण्यासारखं होतं, कारण त्यावर सतत काम सुरु होतं. त्यामुळे भांडण देखील होतं नाही आणि झाली तरी ती लगेच संपतात. तिनं सांगितलं की अनेकदा तर असं देखील वाटलं की दोघांकडे थेरेपी करताना काही सांगायलाचं नसायचं. तर कधीकधी त्यांच्याकडे रिलेशनशिपविषयी बोलायला 1 तास देखील कमी पडायचा. यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं की जेव्हा भांडल्यानंतर शिबानी घरीच ते संपवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिला थेरेपीच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा कर असं सांगायचा. तर फरहान अख्तर यावेळी रियाला सांगितलं की तो त्याच्या दोन्ही मुली शाक्य आणि अकीरासाठी स्वत: ला दोषी समजत होता. त्या सगळ्याचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. मुळात भावनिकदृष्ट्या त्यांना दुखावणार हे साहजिक होतं.
हेही वाचा : काजोलला कोण म्हणतंय दुसरी जया बच्चन, बॉडिगार्डला खरंच धक्का दिला? नेमकं काय घडलं
दरम्यान, फरहानच्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर 2000 मध्ये त्यानं अधुना भबानीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यांचा हा सुखी संसार 17 वर्षांता होता आणि ते 2017 मध्ये विभक्त झाले.