मुंबई : पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतल्यानंतर बराच काळ अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करत होता. एवढंच काय तर फरहानने अधुनाकडून घटस्फोट घेण्याकरता देखील श्रद्धा कपूर कारणीभूत होती. मात्र आता अचानक श्रद्धा कपूरने फरहानला इंस्टाग्रामवरून अनफॉलो कोलं आहे. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की, या दोघांमध्ये काही तरी वाद सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अशी चर्चा आहे की, फरहानच्या आयुष्यात श्रद्धानंतर आणखी एक मुलगी आल्याचं म्हटलं जातं आहे. फरहान 37 वर्षाच्या अभिनेत्री आणि गायक असलेल्या शिबानी दांडेकरला आपलंस केलं आहे. सतत शिबानी आणि फरहानला एकमेकांसोबत अनेकदा स्पॉट केलं आहे. दोघं एकमेकांना गेली 3 वर्षे ओळखत आहेत. 


श्रद्धा कपूरचं नाव फरहानच्या अगोदर आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी देखील मात्र ही गोष्ट नाकारली आहे. श्रद्धाचं फरहानसोबत असलेलं नात कुटुंबियांना आवडत नव्हतो. श्रद्धाच्या कुटुंबियांच असं म्हणणं होतं की, फरहानचं आधी लग्न झालं आहे. 2 मुलांचा वडिल आहे. त्याच्याशी श्रद्धाचं नाव जोडलं जाणं हे चुकीचं आहे.टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर  गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने करिअरची सुरूवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती.   ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.