फरहान अख्तरच्या लग्नासोबतचं पहिल्या पत्नीच्या मुलींची का होतेय चर्चा...
फरहान अख्तरने लग्न करून नव्या आयुष्याची सुरूवात केली, पण...
मुंबई : अभिनेता फरहान अख्तरने मॉडेल शिबानी दांडेकरसोबत लग्न करून नव्या आयुष्याची सुरूवात केली. ठरावीक पाहुण्याच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळ्यात अनेक प्रसिद्ध अभिनेते- अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर पाहुणे मंडळींनी हजेरी लावली. पण आता फरहानच्या लग्न सोहळ्यात पहिल्या पत्नीच्या मुली उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
फरहानच्या मुलींचं नाव शाक्य आणि अकीरा आहे. दोघी वडिलांच्या दुसऱ्या लग्नात पोहोचतील असं सांगण्यात आलं. पण दोघींचा फोटो अद्याप समोर आलेला नाही.
सध्या फरहानच्या लग्नाचे पहिले फोटो लीक झाले आहेत. फोटोंमध्ये फरहान काळ्या रंगाच्या कोट-पँटमध्ये दिसत आहे. तर शिबानी लाल गाऊनमध्ये दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत होती. दोघेही कधी लग्न गाठ बांधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
अखेर या सोहळ्याचा फोटो समोर आला आहे. ख्रिश्चन पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडत असल्याचं समजतंय.