शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचा विवाहसोहळा कोणत्या पद्धतीने पार पडणार? अखेर का अशा पद्धतीने करतायेत ते लग्न
अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे.
मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. आता हे पावर कपल लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज आहेत. मेहेंदी सेरेमनी बरोबरच दोघांच्या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. शिबानी आणि फरहानच्या लग्नाच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत असल्याच्या दिसत आहेत.
अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हे कपल निकाह करणार आहे. तर काहीजण म्हणत आहे या दोघांचं लग्न मरीठी रिती-रिवाजानुसार पार पडेल. मात्र अद्यारतरी या लग्नावर ऑफिशियल अशी काहीच स्टेटमेंट समोर आलेली नाहीये. आता या लग्नाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघंही ना निकाह करणार आहेत. ना हे दोघं मराठी रिती-रिवाजात लग्न करणार आहेत. याएवजी दोघांनी विचार केलाय की, आपलं लग्न वेगळ्या अंदाजात करणार आहेत.
फरहान आणि शिबानी या दोघांनाही सिंपल लग्न करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना अगदी साध्या पद्धतीने आणि साधे कपडे घालून लग्नाला हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. लग्न अगदी साध्या पद्धतीने ठेवण्यासाठी या कपलने लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना पेस्टल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा असं आवाहन केलं आहे. फरहान आणि शिबानी या दोघांना देखील त्यांच्या लग्नाचा गाजावाजा नकोय.
फरहान मुस्लिम आणि शिबानी हिंदू आहे. याच कारणामुळे, त्यांना कोणीही एकमेकांच्या धार्मिक परंपरांचं पालन करण्यास भाग पाडणार नाही ज्याने ते मजबूर होतील. त्यामुळेच दोघांनीही त्यांच्या ईच्छा लिहिल्या आहेत. जे ते आता 19 फेब्रुवारीला म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशी वाचणार आहेत. शिबानी आणि फरहानला ओळखणाऱ्यांना हे चांगलंच माहीत आहे की दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.