Rohit Bal : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक; मृत्यूशी झुंज सुरू
Famous Designer On Ventilator : फॅशन इंडस्ट्रीतील योगदानासाठी प्रसिद्ध असलेले सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Fashion Designer Rohit Bal : फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती गंभीर असून दिल्ली एनसीआरच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये ते व्हेंटिलेटरवर आहेत, असे वृत्त समोर येतं आहे. रोहित बाल हे फॅशन इंडस्ट्रीतील योगदानासाठी ओळखले जातात. तो गुड्डा या नावाने प्रसिद्ध आहे. खादी ग्राम उद्योग आणि कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोसाठी त्याने ड्रेस डिझाइन केले आहेत. रोहित यांच्या जन्म जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये झाला. (fashion designer rohit bal critical and on ventilator in ncrs medanta hospital)
रोहित बलची प्रकृती चिंताजनक
viralbhayani ने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये फॅशन डिझायनर रोहित बल एनसीआरच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर गंभीर स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना रोहितचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टनंतर चाहत्याने त्यांच्या बरं होण्यासाठी प्रार्थना सुरु केली आहे. रोहित बाल हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
रोहित बालला हृदयविकारामुळे मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रोहित बल यांना फेब्रुवारी 2010 मध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत.
या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, गुड्डा जी लवकर बरे व्हा. आणखी एका यूजरने लिहिलंय, हे खूप दुःखद आणि हृदयद्रावक गोष्ट आहे. आणखी एका यूजरने लिहिलंय, पूर्णपणे बरी होऊ लवकर घरी या. अशा कमेंट्स करून यूजर्स आता रोहितच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत.
बाल यांनी दागिने डिझाइनमध्येही पाऊल टाकलं आहे. ते त्यांच्या कमळ आणि मोराच्या आकृतिबंधासाठी खूप प्रसिद्ध आहेत. मखमली, ब्रोकेड सारख्या समृद्ध कापडांचा वापर करत राजेशाही लूकसाठी त्यांचा हातखंड आहे. त्यांना फॅशन वर्ल्डमधील अनेक नावाजलेले पुरस्काराने सन्मानित केलं आहे.