नवी दिल्ली : स्पीड, अॅक्शन, शानदार गाड्या आणि जबरदस्त स्टारकास्टमुळे 'फास्ट अॅण्ड फ्युरियस' सिनेमाचे पहिले आठ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. आता याचाच पुढील सिनेमा कधी रिलीज होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फास्ट अॅण्ड फ्युरियस' आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी सीरिजपैकी एक आहे. मात्र, 'फास्ट अॅण्ड फ्युरियस' सिनेमाच्या आगामी सिनेमाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. 'फास्ट अॅण्ड फ्युरियस-९' हा सिनेमा १९ एप्रिल २०१९ मध्ये रिलीज होणार होता. मात्र, आता या सिनेमाची रिलीज डेट पूढे ढकलण्यात आली आहे.


वेबसाईट 'एसशोबिज डॉट कॉम' ने दिलेल्या वृत्तानुसार, यूनिव्हर्सल स्टूडिओजने घोषणा केली आहे की, 'फास्ट अॅण्ड फ्युरियस-९' हा सिनेमा १९ एप्रिल २०१९ ऐवजी १० एप्रिल २०२० रोजी रिलीज करण्यात येईल.


सिनेमाची रिलीज डेट पूढे ढकलण्याचं नेमकं कारण काय आहे याबाबत स्टूडिओजने कोणतही कारण सांगितलेलं नाहीये. मात्र, 'फास्ट अॅण्ड फ्युरियस-१०' या सिनेमाच्या तारखेत कुठलाच बदल करण्यात आलेला नाहीये. 'फास्ट अॅण्ड फ्युरियस-१०' हा सिनेमा २ एप्रिल २०२१ रोजीच रिलीज करण्यात येईल असे म्हटलं आहे.