मुंबई : झी स्टुडिओ आणि अभिनेता रितेश देशमुख याची निर्मिती असलेल्या 'फास्टर फेणे' सिनेमाविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.



२७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचे क्षितीज पटवर्धन यांनी लेखन केले आहे. अभिनेता अमेय वाघ हा यामध्ये मुख्य भुमिकेत दिसून येत आहे. रितेश देशमुखने ट्विट करुन या ट्रेलरची माहिती दिली आहे.