मुंबई : अभिनेत्री भूमि पेडणेकर 'टॉयलेट - एक प्रेम कथा' या सिनेमाव्दारे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा बिग स्क्रिनवर परततेय. पण, या सिनेमातील भूमिचा लूक बघून सगळेचं सरप्राईज झालेत. कारण या सिनेमासाठी भूमिने तब्बल २५ किलो वजन कमी केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन वर्षांपूर्वी 'दम लगा के हैशा' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या भूमिचा सिनेमातील लूक भन्नाट होता. या सिनेमासाठी भूमिने तब्बल २० किलो वजन वाढवलं होतं. भूमिने ८६ किलो वजन असणाऱ्या युवतीची भूमिका या सिनेमात साकारली होती. भूमिचा हा सिनेजगतापर्यंतचा प्रवास खरचं स्वप्नवत होता.


यशऱाज फिल्मसमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना वाय फिल्मसच्या मनीष शर्मा बरोबर भूमीची ओळख झाली आणि तिचं नशीबचं पालटलं... भूमीच्या पदार्पणातील सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलंय. 


आपल्या पहिल्याच सिनेमातील जबरदस्त अभिनयाने भूमीने सगळ्यांची मनं जिंकली. या सिनेमासाठी भूमीला 'बेस्ट न्यू कमर'चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. 


'दम लगा के हैशा' सिनेमात भूमि जरी नॉन ग्लॅमरस भूमिकेत दिसली असली तरी मुळात भूमि जबरदस्त ग्लॅमरस आहे. 'दम लगा के हैशा' या सिनेमानंतर भूमिने आगामी सिनेमांचा विचार करता तिचं तब्बल २५ किलो वजन कमी केलं. यासाठी बरीचशी तारेवरची कसरत भूमिला करावी लागली. 


योगा क्लास तसेच जिममध्ये तासनतास घाम गाळून भूमिने आपलं वजन कमी केलं..त्याचप्रमाणे भूमिने कडक डाएटही पाळला होता. त्यामुळे सुरुवातीच्या सिनेमापासूनचं भूमिने दाखवलेलं परफेक्शन खरचं वाखाणण्याजोगं आहे.


आता भूमी खिलाडी कुमार बरोबर 'टॉयलेट - एक प्रेम कथा' या सिनेमात दिसणार आहे. सिनेमातील भूमीचा रोलही दमदार वाटतोय. या सिनेमात भूमीला बघताच चाहत्यांच्या मनात हीच भूमी पेडणेकर आहे का? असा प्रश्न पडला असेल तर नवल वाटायला नको, इतकी भूमीने आपली फिगर मेन्टेन केलीय.


या सिनेमानंतरही भूमिचे अनेक बडे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे पदार्पणाच्या सिनेमापासून भूमीने जे परफेक्शन दाखवलं आहे, ते बघता ती बॉलिवूडमध्ये लंबी रेस का घोडा आहे असं मानायला हरकत नाही.