मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यावर आधारित 'न्याय' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  सुशांतच्या वडिलांनी चित्रपटावर बंदी घलण्याची मागणी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे आणि त्यावर बंदी घालावी यासाठी याचिका दाखल केली. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस  पाठवली आहे. तर नोटीसच्या माध्यमातून न्यायालयाने निर्मात्यांकडून जबाब देखील मागितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतच्या वडिलांनी याचिका दाखल करत, सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशात जर चित्रपट  प्रदर्शित करण्यात आला, तर केसवर त्याचा परिणाम दिसून येईल. असं त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.


बातमी : 


टीझरच्या सुरवातील न्यूज चॅनलवर सुशांतच्या आत्महत्येची ब्रेकिंग न्यूज सुरू असते. त्यानंतर चौकशी. इतरांची आत्महत्या प्रकरणात एन्ट्री इत्यादी  घटानांची झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. तर चित्रपटात सुशांतच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणार आहे.