Father`s Day 2024: अमृता खानविलकर वडिलांकडून शिकली `ही` खास गोष्ट
Father`s Day 2024 Special : अमृता खानविलकरनं `फादर्स डे` निमित्तानं वडिलांकडून काय शिकली `या` विषयी सांगितल
Father's Day 2024 Special : जन्म देण्यापासून ते अगदी पुढे जाऊन आपल्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापर्यंत जो बॅक सपोर्टवर असतो तो म्हणजे आपला बाबा! आजच्या फादर्स डे निमित्तानं अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या बाबासाठी खास भावना व्यक्त केल्या आहेत. कामात व्यस्त असून ही अमृता तिच्या बाबांबद्दल काय बोलली आहे बघू या ....
अमृतानं हिंदी आणि मराठीत तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं कायम प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आणि ती नुकतीच तिच्या आई-बाबांसोबत एका खास लंडन ट्रीपला सुद्धा गेली होती. अमृता तिच्या बाबांबद्दल बोलताना म्हणते "माझे वडील एक स्व-शिक्षित सकारात्मक व्यक्ती आहेत, ज्यांनी एकट राहून आनंदी राहण्याची कला साध्य केली आहे. त्यांना प्रवासाची आवड आहे आणि एकटं राहूनही आनंद कसा मिळवायचा हे मी त्यांचा कडून शिकले आहे. या गोष्टीचं त्यांची एक मुलगी म्हणून मला फार कौतुक आहे. बाबा कडून मी एक खूप खास गोष्ट शिकले ती म्हणजे की आनंद हा आतून येतो आणि एकटं राहण्याचा अर्थ एकटं असणं नाही. जेव्हा मी बाबांच्या वयात येईन तेव्हा त्यांच्यासारखा फक्त दोन टक्के आनंद मिळवू शकले तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेन.'
पुढे अमृता म्हणाली, 'आपण सगळेच आपल्या आई बाबांकडून अनेक गोष्टी शिकत असतो आणि बाबा कडून शिकताना मला समजल की आनंद ही एक निवड आहे आणि एकांत स्वीकारल्यामुळे सखोल आत्म-शोध आणि वैयक्तिक वाढ होऊ शकते. एकटं असूनही आपण समाधानी आणि उत्साही कसे राहू शकतो हा धडा माझ्यासाठी अमूल्य आहे आणि मी तो माझ्या स्वतःच्या जीवनात समाविष्ट करते. त्यांच्या सारखं समाधानी आणि आनंदाच्या फक्त एका अंशाला जरी पोहचले तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेन.'
हेही वाचा : कुणाला विश्वास बसेल का? 80s चा सर्वात लोकप्रिय अभिनेता आधी नक्षलवादी होता!
अमृता कितीही शूटमध्ये व्यस्त असली तरी ती तिचा फॅमिली टाईम कायम वेगवेगळ्या गोष्टी गुंतवताना दिसते, मग ती ट्रीप असू दे किंवा आई बाबां सोबतचा खास वेळ असो ती कुटुंबासोबत नेहमीच सोबत राहते आणि यातून तिचं तिच्या बाबां सोबतच खास नात देखील पहायला मिळतं.
अमृता ने आजवर अनेक प्रोजेक्ट्समधून सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. 2024 वर्षात ती अनेक उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. सोबतीला आता एका नव्या कार्यक्रमाचं परिक्षण सुद्धा करणार आहे. '36 डे' , 'कलावती' , 'ललिता बाबर' आणि 'पठ्ठे बापूराव' या सारख्या प्रोजेक्ट्समधून अमृता पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.