मुंबई : बॉलिवूड स्टार किड्सच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच अव्वल स्थानी असतात. चाहते सुद्धा या कलाकारांच्या मुलांची एक झलक पाहाण्यासाठी आतुर असतात. सध्या अशाच एका अभिनेत्याची मुलगी सोशल मीडियावर सुरु आहे. तो अभिनेता म्हणजे नील नितीन मुकेश. नील तसा सोशल मीडियापासून लांब असतो. तो फक्त त्याच्या अपकमिंग चित्रपटाचे फोटो शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. पण, फादर्स डेच्या निमित्ताने मात्र त्याने एक सुरेख अशी पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्याने त्याच्या मुलीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नीलची चिमुकली तिच्या काकासोबत खेळत आहे. नमन मुकेश तिला वाघ कसा करतो? असा प्रश्न तिला विचारत आहे. सध्या नुर्वीचा हा निरागस अंदाज सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.


अभिनेता नितिन मुकेश 'साहो' चित्रपटात झळकणार आहे. 'साहो' चित्रपटात नील नितीन खलनायकाच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे, तर प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिका बजावणार आहे.   


प्रभास आणि नील नितीन मुकेशव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे आणि श्रद्धा कपूर अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. 'साहो' येत्या 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.