मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखला दररोज तिच्या स्टाईल आणि सौंदर्यासाठी प्रशंसा मिळते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि तिचे नवीन फोटोशूट शेअर करून चाहत्यांशी संपर्क राखते. पण तुम्हाला माहिती आहे का? की वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला लैंगिक शोषणला सामोरं जावं लागलं होतं. एवढंच नाही तर फातिमा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिला बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फातिमाने सांगितली आपबीती
फातिमा सना शेखने गेल्या वर्षी एका मुलाखतीत कास्टिंग काउच आणि बालपणातील गैरवर्तन यावर खुलासा केला होता. तिने हा वेदनादायक अनुभव शेअर केला. अभिनेत्रीने सांगितले की, ती 3 वर्षांची असतानाच तिचा विनयभंग झाला होता. हे स्त्रियांसाठी अशा कलंकाप्रमाणे आहे की ते याबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. पण आता मला आशा आहे की, काळ बदलला आहे. आता देशात आणि जगभरातील लोकांमध्ये लैंगिक छळाबाबत जागरूकता वाढली आहे. पूर्वी असं म्हटलं होतं की, या सगळ्याबद्दल बोलू नका. लोकांचा गैरसमज होईल.


कास्टिंग काऊचवर खुलासा 
एका मुलाखतीत फातिमाने कास्टिग काऊच संबधित एक धक्कादायक खुलासा केला होता. की, कास्टिंगमुळे तिला कित्येकदा काम गमवावं लागलं होतं. ती म्हणाला की, 'मला बऱ्याच वेळा ऐकावं लागलं की तू कधीही नायिका बनू शकणार नाहीस. तुम्ही दीपिका पदुकोण किंवा ऐश्वर्या रायसारखे दिसत नाही. तू नायिका कशी बनशील? बरेच लोक तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटतं की हे ठीक आहे, हे लोक सौंदर्याकडे एवढ्या प्रमाणात पाहतात की अशी दिसणारी मुलगीच नायिका बनू शकते. मी त्यांच्या साच्यात बसत नाही, पण आता अनेक संधी माझ्याकडे आहेत. माझ्यासारख्या लोकांसाठीही चित्रपट बनवले जातात, जे सामान्य आणि सरासरी दिसतात, सुपरमॉडल्ससारखे दिसत नाहीत.


सेक्स केल्यावरच तुम्हाला मिळेल काम!
कास्टिंग काउचबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, मी कास्टिंग काऊचचाही सामना केला आहे. आयुष्यात एकवेळ अशी आली आहे जेव्हा असं म्हटलं गेलं की, तुम्ही सेक्स कराल तरचं तुम्हाला काम मिळेल.